Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

प्यार का पंचनामा भाग १

या सदराखाली प्रेमाच्या विविध प्रकारांची ओळख करून देणारे लेख पाच भागांत मी पोस्ट (रिपोस्ट) करणार आहे.. त्यातील हा पहिला भाग –

  • डॉ सचिन लांडगे. भुलतज्ञ, अहमदनगर.
    Sternberg’s Theory नुसार तीन प्रकारच्या भावना आणि त्यांचा कमीअधिकपणा यावर सगळ्या प्रकारच्या प्रेमांचा महाल उभा असतो..
    १. एक म्हणजे Intimacy (दाट सख्य/जवळीक)..
    याची सुरुवात Liking (आवड) नी होते..
    २. दुसरी भावना म्हणजे Passion (उत्कटता)..
    याची सुरुवात Infatuation (आकर्षण/मोह) नी होते.. याला आपण प्रेमवेड म्हणू शकतो..
    ३. आणि तिसरी भावना म्हणजे Commitment (वचनबद्धता)..
    ही वचनबद्धता म्हणजे केवळ लग्न किंवा Engagement नव्हे.. तर वचनबद्धता म्हणजे एकमेकांत कुठलंही नातं सुरू करण्यासाठी त्याच्या अलिखित नियम व अटींसाठी दर्शविलेली (मूक अथवा उघड) सहमती, एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं दिलेलं आश्वासन.. (या अपेक्षा वेगवेगळ्या नात्यांत वेगवेगळ्या असतात).. आणि एकमेकांची घेतलेली जबाबदारी..
    यानुसार प्रेमाचे सात प्रकार होतात –
    १. Liking only.
    २. Infatuation only. (Love at first sight)..
    ३. Commitment only. (Empty Love)
    ४. Infatuation + Commitment = Fatuous Love (प्रेमळ प्रेम).
    ५. Liking + Commitment = Companionate Love (सोबती प्रेम)
    ६. Intimacy + Passion = Romantic Love (प्रणयरम्य प्रेम)
    ७. Intimacy + Passion + Commitment = Consummate Love (परिपूर्ण प्रेम)

आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक नात्यातलं प्रेम , मग ते मित्रामित्रातलं असो, कुटुंब नात्यातलं असो, किंवा मग गर्लफ्रेंड-बॉयफ्रेण्ड, नवरा-बायको, आणि मित्रमैत्रिण, अशा कोणत्याही नात्यातलं प्रेम हे नक्की कोणकोणत्या प्रकारात येतं ते आपण बघू..


Liking only –
या प्रकारात साधारणतः सर्व प्रकारची ‘मैत्री’ येते. मित्रा-मित्रातली किंवा मित्र-मैत्रिणी मधली निखळ मैत्री या सदरात मोडते..
[जेव्हा ती मैत्री दाट होऊ लागते तेंव्हा त्यात commitment (अपेक्षा, आश्वासकता आणि जबाबदारी) येते. मैत्री आणि दाट मैत्री यात फरक कमिटमेंट्सचा असतो.. अशा नात्याला Companionate Love (म्हणजेच, सोबती प्रेम) म्हणतात. ते आपण पुढे पाहू..]
या Intimacy (जवळीक) ची सुरुवात Liking ने होते.. जवळीक ही फक्त शारीरिकच असते असं नाही.. Intimacy ही साधारणतः चार प्रकारची असते.. Emotional (भावनिक), Psychological (मानसिक), Spiritual (आत्मिक), आणि Physical (शारीरिक).. [यातली शारीरिक जवळीक ही ‘प्रेम/सेक्स’ या अर्थाने न घेता, प्रत्यक्ष एकमेकांसोबत असणे किंवा सलगी/सहवास या अर्थाने घ्यावी..]


Infatuation only –

यात फक्त मोह किंवा शारीरिक आकर्षण असतं. Love at first sight हा यातलाच प्रकार.. Infatuation मधून सुरुवात होणं ठीक आहे, पण ते त्याच्या पुढं गेलं पाहिजे.. Infatuation जर दोघांनाही असेल तर त्यांना ‘Friends with benefit’ म्हणतात. यांच्यात मैत्री असू शकते, पण भावनिक गुंतवणूक नसते.. आणि हे Infatuation/आकर्षण एकालाच असेल तर त्याला ‘एकतर्फी प्रेम’ म्हणू शकतो आपण.. (एकतर्फी प्रेमाबद्दल आपण पुढच्या भागात सविस्तरपणे बघू)

Commitment only –

  • कुटुंबातील बरीच नाती अशी असतात. भावाभावात किंवा भाऊबहिणीत किंवा कोणत्याही कौटुंबिक नात्यात फक्त जबाबदारी शिल्लक असते पण एकमेकांबद्दल काहीच attachment जवळीक जिव्हाळा नसतो, आपण केवळ करायचं म्हणून करत असतो.. ती नाती Commitment only या प्रकारात येतात..
  • लग्न (विशेषतः अरेंज मॅरेज) केलेल्या बऱ्याच जोडप्यात फक्त कमिटमेंट (तीही जुजबी) असते. त्यातल्या एकाला किंवा कधीकधी दोघांनाही एकमेकांशी मानसिक/भावनिक जवळीकही नसते आणि लैंगिक आवडही नसते.. केवळ गरजेपुरता शरीरधर्म पाळला जातो.. फक्त नातं निभावणं सुरू असतं. याला Empty Love असंही म्हणतात..
    अरेंज मॅरेजच नव्हे तर कोणतंही नातं जवळीक आणि उत्कटतेअभावी Empty love होतं..

Fatuous Love – म्हणजे प्रेमळ प्रेम.

  • साधारणतः courtship मध्ये (म्हणजे लग्न ठरल्यापासून ते होण्यापर्यंतच्या काळात) असं प्रेम असतं.. यात commitment दिलेली असते, एकमेकांबद्दल शारीरिक आकर्षणही असतं, तीव्र ओढ असते, पण मानसिक/भावनिक जवळीक (अजून तितकीशी) झालेली नसू शकते.. अरेंज मॅरेज मध्ये लग्नासाठी दिलेल्या होकाराचा अर्थ ‘ती व्यक्ती आवडलेली आहे’ असं नसू शकतं ना! एकमेकांना अजून इतकं समजून घेतलेलं नसतं. या काळात काहीजण खरंच प्रेमात पडून रोमँटिक लव्ह मध्ये enter होतात.. असो..
  • बरीच जोडपी लग्नानंतर याच पातळीवर राहतात/येतात.. एकमेकांच्या मनात घर करणं त्यांना (किंवा त्यातल्या एकाला) जमत नाही.. त्यांच्या फारसं भावनिक शेअरिंग नसतं, मनापासूनचं केअरिंग नसतं, आत्मिक बंध नसतात (एकमेकांच्या सहवासातून आत्मिक शांती/ Inner peace मिळत नाही), त्यांच्यात चांगली मैत्री देखील नसते, पण त्यांच्यात एकमेकांबद्दलची शारीरिक ओढ मात्र टिकून असते आणि एकमेकांप्रति commitmentही असते..
    जर कालांतराने त्यांच्यातलं infatuation (एकमेकांबद्दलची शारीरिक आसक्ती) संपलं तर नातं टिकवायची धडपड (Commitment only) सुरू होते.. Fatuous Love मधले Passion संपलेले हे commitment only संसार मग समाजासाठी आणि मुलाबाळांसाठी सुरू राहतात..

( क्रमशः )

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *