Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

Dr. Sachin
Landge's
Writings

मनोगत

मी एक मध्यमवर्गीय घरात वाढलेला माणूस आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबामधल्या सर्वसामान्य धार्मिक रूढी-परंपरा, व्रतंवैकल्यं यांच्या संस्कारांत मी लहानाचा मोठा झालो. एवढंच नाही तर जवळपास निम्मंअधिक आयुष्य या सगळ्याचं मी पालन आणि जतन करत राहिलो. त्यानंतर मात्र माझ्यात काहीतरी बदलवणारी प्रक्रिया सुरू झाली. त्यातून मी आज इथवर पोहचलो आहे की, आता मी देव मानत नाही, धर्म मानत नाही. विषमता आणि अंधश्रद्धा जोपासणाऱ्या कर्मकांडांपैकी मी काहीही करत नाही. आणि मला बाबा, महाराज, देवी यांच्या बोलण्यातून किंवा भक्तीतून, मन:शांती किंवा दिलासा मिळवण्याची गरजही आजवर वाटलेली नाही. (याचा अर्थ अशी गरज वाटावी अशा कसोटी बघणाऱ्या घटना माझ्या जीवनात आल्याच नाहीत असं नाही. पण अशा जीवघेण्या प्रसंगी देवाचा धावा करून त्याला साकडं घालून काही मिळतं, यावर माझा अजिबात विश्वास नाही.)
मी जसजसा अधिक विचार करायला लागलो, आज्ञाधारकपणा सोडून प्रश्न विचारायला लागलो, तसतसा या “देव” संकल्पनेतला, धर्मातला, आणि कर्मकांडातला फोलपणा मला समजायला लागला.. ‘देव’ ही संकल्पना माणसानं आपल्या एकटेपणावर, अचानक कोसळणाऱ्या संकटांवर मात करण्याचं बळ मिळावं, आपलं दु:ख हलकं करण्यासाठी एक मानसिक आधार हवा म्हणून निर्माण केली. त्याला तितपतच महत्त्व देणं ठीक.
संकटसमयी देवाचा धावा करून त्याद्वारे त्या संकटाशी सामना करायची शक्ती मिळवणं ठीक असेल; परंतु त्याचं परावलंबित्व पत्करून, त्याच्या नसलेल्या अस्तित्वावर भार टाकून आपलं भवितव्य त्याच्या स्वाधीन करणं कितपत योग्य आहे? (आणि नेमकं याच मानसिक भावनेचं अवडंबर माजवून काहींनी त्याचा धंदा मांडला, काहींनी तर त्याच्या भीतीनं इतरांचं शोषण, लुबाडणूकच सुरू केली.)…

नवीन लेख

लेखांचे विषय

नास्तिकता, फेमिनिजम, धर्म आणि दशतवाद, लैंगिकता इ. महत्वाच्या विषयांवर मी माझी मतं, अनुभव, विचार वेगवेगळ्या लेखांच्या माध्यमातून इथे मांडले आहेत.

नास्तिकता

My Favourite
Memes

My Favourite
Quotes

Contact

Let's get in touch

Message

Contact

Email Address

drsachinlandge@gmail.com

Social Media

मित्रांसोबत शेअर करा.