Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

प्यार का पंचनामा भाग ४

Romantic love & Consummate Love –
प्रियकर-प्रेयसी यांच्यातलं प्रेम हे या प्रकारातलं असतं.. रोमँटिक प्रेमात एकमेकांची गुंतवणूक (Intimacy) असते आणि एकमेकांच्यात लैंगिक आकर्षणही (Passion) असते..
[जर दोघांत काहीच गुंतवणूक नसेल तर अशा दुतर्फा Infatuationला ‘Freinds with benefit’ म्हणतात].. असो..
आता या Romantic Love मधल्या कमिटमेंट बद्दल पाहू.. हे जरा समजायला क्लिष्ट आहे.. कारण, या रोमँटिक प्रेमात जेंव्हा मनापासून कमिटमेंट दिली/घेतली जाते, तेंव्हा ते consummate (किंवा परिपूर्ण) Love बनतं..
पहिली गोष्ट, कमिटमेंट म्हणजेच लग्न असं नव्हे.. दुसरी गोष्ट, रोमँटिक प्रेम केवळ अविवाहित लोकच करतात असं नव्हे, आणि तिसरं म्हणजे, रोमँटिक प्रेम ही तरुणांचीच मक्तेदारी आहे, असं नव्हे..
आणि मुख्य म्हणजे प्रेम हे आयुष्यात एकदाच होतं असं तर अजिबातच नव्हे..
आपण Intimacy च्या चार पातळ्या बघितलेत.. यातल्या Physical आणि Psychological (Mental) पातळीपर्यंत कमिटमेंट्स येत नाहीत, पण भावनिक आणि आत्मिक Intimacy निर्माण झाली, तर कमिटमेंट्स आपोआप येतात.. आणि ते प्रेम Consummate Love (परिपूर्ण प्रेम) होण्याकडं वाटचाल सुरू होते.. (पुन्हा सांगतो, commitment म्हणजे लग्न नव्हे!, किंबहुना लग्न हा प्रेमाच्या सफलतेचा क्रायटेरियाच नाही..) कारण, प्रेम हे मानवाच्या उत्पत्तीपासून आहे. ते लाखो वर्षांपासून आहे.. अन विवाहसंस्था येऊन फक्त चार पाच हजार वर्षे झाली असतील.. म्हणून प्रेमाचा अन लग्नाचा काहीएक संबंध नाही.. म्हणजे, लग्न ही प्रेमातली commitment नसून, लग्न हा ती कमिटमेंट ‘long term’ करण्याचा केवळ एक मार्ग आहे..
आपलं प्रेम असलेल्या व्यक्तीशी ‘लग्न’ करून आपण नक्कीच आपल्या प्रेमाप्रतिची आपली commitment ही long term करण्यास मदत करतो, पण ती मनातून देखील तशीच राहिली पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे.. कारण कमिटमेंट ही मनातून द्यायची असते.. म्हणून ‘लग्न’ हे प्रेमाच्या सफलतेचा निकष नाही ठरू शकत..
आणि दुसरी गोष्ट, कमिटमेंट लॉंग टर्म करण्याचा लग्न हा सध्याच्या परिस्थितीतला आणि समाजमान्य मार्ग जरी असला तरी कुठल्या इतर कारणांनी तो मार्ग अवलंबिता नाही आला, तर ते प्रेमच चूक ठरत नाही.. कारण प्रेम झालंय म्हणून लग्न व्हावंच हे गृहीतकच चूक आहे, आणि लग्न होऊ शकणार नाही म्हणून प्रेम नाकारणंही चूक आहे.. आपलं त्याला आपले समाजनीतीचे नियम लावणेच चूक आहे.. ह्या साच्यात बसलं तरंच तुमचं खरं प्रेम! आणि लग्न केलं तरंच तुम्ही खरे प्रेमी! असं काही नसतं..
अशी कल्पना करून पहा, की आपल्या आजूबाजूला विवाह नावाचा प्रकारच अस्तित्वात नसता तर प्रेमाधारावरच नाती बनली, मॅच्युअर झाली अन टिकली असती.. तेच आता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मधून समोर येतंय.. असो..
आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आणि कोणत्याही वयात रोमँटिक लव्ह होऊ शकतं.. आपण प्रेम करतो, जीवापाड जपतो.. पण कधी परिस्थिती किंवा प्रायोरीटी आडवी येते, आपण कमिटमेंट लॉंग टर्म पाळू शकत नाही.. मग आपण प्रॅक्टिकली ‘मूव्ह ऑन’ होतो, संसारात रमतो, परत प्रेमातही पडतो.. पण म्हणून आपण चुकीचे ठरत नाही की आपली आधीची प्रेमं चुकीची ठरत नाहीत.. ज्या त्या वेळेसच्या आपल्या भावना सच्च्या असतात.. आठवणीतलं प्रेम आणि प्रेमाच्या आठवणी आपल्या भावनांचा डोह कधीही ढवळून काढू शकतात.. आणि हीच प्रेमाची ताकद आहे..
असो..
एक प्रेम हे दुसऱ्या प्रेमात बदलूही शकते, आणि काळाच्या ओघात कमीजास्तही होऊ शकते.. उदाहरणातून हे समजून घ्यायचे असेल तर-
१. समजा तुम्हाला ऑफिस मधली कलीग खूप आवडतीये, आणि तुमचं तिच्यावर प्रेम जडलं तर ते Infatuation आहे..
२. समजा ती तुम्हाला दिसण्याबाबत ठीक आहे पण त्याहीपेक्षा जास्त ती तुम्हाला स्वभावाने आणि मनाने आवडलीये, (Liking only).. तुमच्यात मैत्री झालीये (Intimacy).. तुमची खूप छान मैत्री आणि भावनिक जवळीक आहे, पण दोघांच्या मनात शारीरिक उत्कटता नाहीये, तर ते झालं Companionate Love (सोबती प्रेम).. तुमच्यात भावनिक जवळीकीसोबतच तुमच्यात वैचारिक आणि आत्मिक बंध पण निर्माण झालेत, तर ते आहे प्लेटोनिक लव्ह..
३. समजा यात तुम्हाला एकट्याला शारीरिक आकर्षण पण निर्माण झालं, तर ते आहे स्वप्नरंजन प्रेम.. किंवा ती मॅरीड आहे, आणि तिची अन तुमची चांगली मैत्री आहे, पण तुम्हाला एकट्यालाच तिचं शारीरिक आकर्षण पण आहे, तर ते झालं स्वप्नरंजन प्रेम..
हे सगळं एकतर्फी प्रेमच असतं..
४. समजा तुमची ऑफिस मधली कलीग आहे, ती तुम्हाला आवडतीये, तिच्याशी तुमची मैत्री आहे, अन एकमेकांबद्दल दोघांना प्रेम भावना उत्पन्न झाल्या (मग त्यातला एक किंवा दोघेही मॅरीड असोत नसोत) तर ते आहे रोमँटिक प्रेम.. हे रोमँटिक प्रेम केवळ भावनेच्या पातळीवर न राहता, यात जर एकमेकांना कमिटमेंटची संधी मिळाली तर ते Consummate Love (परिपूर्ण प्रेम) होतं.. लग्नातून केवळ ती कमिटमेंट लॉंग टर्म आणि समाजमान्य होते.. पण लग्न होऊ शकलं नाही तर हे Consummate Love दोघांच्या मनोविश्वात भावनिक पातळीवर राहते (जोपर्यंत काळ आणि प्रायोरीटीज त्याला पुसट करत नाहीत)..
५. या रोमँटिक किंवा consummate प्रेमात त्यांचं लग्न होऊ शकलं नाही, तर त्यातला एक (किंवा दोघंही) जण काळाच्या ओघात फक्त मैत्री कडं जाऊ शकतो/शकतात, आणि पुढं आपल्या जोडीदाराशी किंवा इतर कोणाशी कदाचित प्रेमात देखील पडू शकतात..
६. किंवा रोमँटिक प्रेमात त्यांना कमिटमेंट ची संधी नाही मिळाली आणि पुढं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची लग्ने झाली तर त्यातला एक (किंवा दोघेही) काळाच्या ओघात पुढं आपल्या जोडीदाराशी किंवा इतर कोणाशी प्रेमात देखील पडू शकतो/शकतात, आणि पूर्वीच्या प्रेमात फक्त शारीरिक आकर्षणापुरतं राहू शकतो/शकतात..
७. समजा, या दोघांचं लग्न झालं, पण पुढं त्यांच्यात भावनिक दुरावा आला, तर ते प्रेम केवळ Fatuous love राहू शकतं, आणि भावनिक दुराव्यासोबतच त्यांच्यात शारीरिक आकर्षणही नसेल तर ते Empty Love ही होऊ शकतं..

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *