मोदींनी विकास केला की नाही, ह्यापेक्षाही मला त्यांनी केलेली एक वेगळी गोष्ट महत्वाची वाटते.
त्यांनी आपल्या आजूबाजूला आपले मित्र, नातेवाईकांमध्ये उभी फूट पाडण्याचे काम केले.. राजकीय विरोधकांना डायरेक्ट आपले शत्रू मानायला आणि द्वेषालाच देशप्रेम मानायला आपल्या आजूबाजूच्या अनेक लोकांना यांनी शिकवले..
त्यांनी पाच वर्षात किती आश्वासने पाळली ते जाऊ द्या, त्यांनी फेकू भाषणे केली ती पण माफ करा, त्यांनी किती मुद्द्यांवर घुमजाव केले, त्यांनी देशाला अडचणीत टाकणारे निर्णय घेतले किंवा ते कितीवेळा रडले याहीपेक्षा, त्यांनी (आणि त्यांच्या आयटी सेल ने) द्वेषप्रचार ही गोष्ट खूप पद्धतशीरपणे केलीये आणि त्याबद्दल मला खूपच वाईट वाटतं..
मित्रांमध्ये पडलेली फूट तर इथे जवळजवळ प्रत्येकाने अनुभवली आहे. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र जो, एखाद्या लहान मुलाशीसुद्धा कधी ओरडून बोलला नसेल तो मोदीप्रेमाने आंधळा होऊन परवाच माझ्याशी बोलताना ’तुम्ही मोदींवर भुंकता’ या भाषेत बोलला..
आमचे काही सुशिक्षित चांगले मित्रही अतीव तुच्छतेने ’ते तुमच्या वॉलवरचे समाजवादी….’ किंवा ’तुमचे ते फुरोगामी मित्र…’ या भाषेत बोलू लागले आहेत..
काही लोक तर उच्चशिक्षित असूनही विरोधकांबद्दल बोलताना डायरेक्ट शिवीगाळीवर येऊ लागले आहेत.. ह्यातल्या एकाचंही मूलगामी वाचन नाही.. सगळे व्हाट्सएप युनिव्हर्सिटीच्या फॉरवर्डस/व्हिडीओज आणि दाव्यांना बळी पडलेले आहेत..
मी त्यांच्याशी बोलताना राजकारण हा विषय कटाक्षाने टाळतोच(!) तरीपण मी त्यांच्यापेक्षा वेगळे राजकीय मत बाळगतो ही गोष्ट त्यांना भयंकर बोचते.. इतकं कलुषित वातावरण निर्माण झालेलं आहे की, मी कितीही टाळले तरी त्यांना कुठूनतरी मोदीचा विषय आणून आपली भक्ती दाखविण्याची आणि माझा मूर्खपणा उघड करण्याची फार इच्छा होत असते..
कुण्या एका स्वयंघोषित त्राता नेत्यासाठी/पक्षासाठी आपल्या रक्ताच्या, मैत्रीच्या, आपुलकीच्या, किंवा व्यावसायिक बांधिलकीच्या नात्यांमध्ये इतका प्रचंड राग, द्वेष, त्वेष आपण कुठून आणला? का आणला? याचा विचार एकदा करुन पाहावा.
भक्ती करता करता प्रत्येक गोष्टीचे नको इतके ध्रुवीकरण समाजातल्या प्रत्येक स्तरावर केले गेले आहे..
तुम्हाला मोदींना मत द्यायचेय तर द्या, पण उन्माद माजवू नका, इतरांनाही प्रश्न विचारायचा अधिकार आहे, असं सांगून समजावून कोणालाच काहीच फरक पडत नाही..
मग घराघरातली, ऑफिसातली, व्हाट्सएप ग्रुप्समधली, मित्रामित्रांतली ही उभी फूट अगदी गप्प बसून पहात राहण्याशिवाय आणि त्याविरोधात फक्त लिहीत राहण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही..
सचिन लांडगे.
- (मंदार काळे यांच्या पोस्ट वरून प्रेरित)