Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

Flirting की Harassment ?

 

– डॉ सचिन लांडगे.

 

Flirting आणि Harrassment यात एक फरक असतो.. तो म्हणजे Interests चा…

स्त्री असो की पुरुष दोघांच्या बाबतीत हे लागू आहे..
आपले interests च ठरवत असतात की समोरच्याने केलेली कॉमेंट/कॉम्पलिमेंट/कृती ही आपल्याला सहज वाटतेय, की ती harrassment कडे झुकतेय..

प्रत्येकाचे हे interests वेगवेगळे असू शकतात. काहींचे इंटरेस्ट looks असतात, काहींना intellect जास्त appeal होतो, तर काहींना financial position महत्त्वाची वाटते, तर काही तो/ती व्यक्ती आपल्या किती Close वर्तुळातली आहे, यावरून ठरवतात.. इतरही अनेक interests/preferences असू शकतात.

नाक्यावरच्या पोराने शिट्टी वाजवून छेडणे, बहुतांश जणींना harrassment वाटेल, पण तशा गोष्टी आवडणाऱ्या देखील मुली आहेत. हा जिच्या तिच्या interests चा विषय आहे. आवारापंती अन् dashingness आवडणाऱ्या पण खूप मुली आहेत. कोणाच्या पाहण्यात या गोष्टी नसतील तर त्यांचा अभ्यास कमी आहे, असा त्याचा अर्थ आहे.

आपले intrests काय असावेत हे आपले वय आणि आपले संस्कार (“मान्यता” या अर्थाने) ठरवत असतात.
दुसरा मुद्दा म्हणजे, हे जे प्रत्येक व्यक्तीचे interests आहेत, ते वाढत्या वयानुसार कमी होत जातात. अन् बदलतात देखील.. हार्मोन्सची पातळी त्या लेव्हलवरचे वयानुसार होत जाणारे बदल हे त्यासाठी कारणीभूत असतात.

Flirting करण्याच्या बाबतीत म्हणलं तर काही पुरुषांच्या बाबतीत मरायला टेकलं तरी interests शून्य होत नाहीत, काहींना तर समोरची स्त्री ही केवळ मादी आहे, इतकं देखील पुरतं.. पण बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत तसं होत नाही. निसर्गतः पुरुषांपेक्षा स्त्री ही खूप choosy आहे. Flirt करण्याच्या किंवा Flirting ला प्रतिसाद देण्याच्या बाबतीत तिचे interests सहजी fullfill होत नाहीत. तर काहींचे शून्य देखील असू शकतात.

समोरच्याचं वागणं आपल्याला flirting वाटते की ती harrassment कडे झुकतेय असं वाटतं याला आणखी दोन घटक कारणीभूत आहेत. एक म्हणजे संमती (Consent) आणि दुसरा म्हणजे परिस्थिती (Circumstances).. आपण जिथं राहतो किंवा जिथं काम करतो तिथं बहुतांश स्त्री पुरुष flirt करत नाहीत किंवा flirting ला response देत नाहीत. पण आजूबाजूचा समाज अनोळखी असेल तर मात्र परिस्थिती बदलू शकते. जसं की, युपी बिहार मधल्या मुली कदाचित तिथं काही करणार नाहीत, पण पुण्यामुंबईत शिकायला आल्यावर वेगळं काही करण्याच्या किंवा त्यांचा response बदलण्याच्या शक्यता वाढतात.

दुसरा मुद्दा संमतीचा. ही संमती तेंव्हाच असते, जेंव्हा समोरच्याचं कोणतं वागणं acceptable आहे आणि ते कितपत acceptable आहे, याच्या सीमा मनात स्पष्ट असतात.. यात कोणतं आणि कितपत हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. यातली ही संमती काय पेपरवर किंवा तोंडी देण्याघेण्याची गोष्ट नसते. ती संमती कधी कल्पित तर कधी गृहीत असते. काही वेळा अंदाज चुकतो देखील. म्हणून मूकसंमती नसणे, ती चुकीची कल्पिने , ती जास्त प्रमाणात गृहीत धरणे, किंवा अतिधिटाई किंवा अतिघाई करणे, या बाबी साध्या कॉमेंटला/कृतीला flirting ऐवजी harrasment कडे घेऊन जातात.
आजूबाजूची परिस्थिती देखील यात महत्त्वाची असते. म्हणजे, समजा एखादी व्यक्ती समोरच्याच्या कॉमेंट्/कॉम्पलीमेंट किंवा कृतीला एरवी lightly घेऊन सोडून देत असेल, पण असा प्रकार चारचौघात झाला असेल, किंवा अनोळखी व्यक्तींसमोर (not so close groups) झाला असेल, तर मात्र ती harrassment बनण्याची शक्यता वाढते.

मी Anaesthesia चा SR असताना एक लेक्चरर मुलगी नविन जॉईन झाली. ती माझ्यासोबत flirt करू लागली. मागे मागे येणे, सारखं चहाकॉफी साठी विचारणे, चेहऱ्याकडे सूचक पाहणे वगैरे तीनचार दिवस चालले.. दिसायला जरा ठीकठाक होती, आणि कुणी मुलगी आपल्याला असं स्वतःहून करतेय म्हणल्यावर मला पण जरा बरं वाटत होतं. जरी मी अजिबातच respond नाही केलं (कारण ती lecturer होती अन् मी शिकाऊ रेसिडेंट), तरीही i was enjoying that flirting he नक्की.. पण पाच सहा दिवसांनी आणखी गोष्टी वाढत गेल्या, अन् मला त्याचा जाच होऊ लागला. मला आता ती harassment वाटू लागली. आणि मी आमच्या HOD मॅडम कडे तिची तक्रार केली. (हे सगळं ऐकून पहिलं दोन मिनिट तर त्या हसतच होत्या.) असो.. त्या मुलीचे वडील तिथंच फॉरेन्सिक चे HOD होते, त्यामुळं प्रकरण व्यवस्थित मिटलं. तेंव्हाच्या माझ्या जवळच्या बऱ्याच residents ना हा किस्सा माहीत आहे.
मला इथं हे विचारायचं आहे, की तिची flirting ही मला harrasment वाटू लागली, म्हणजे इथे काय बदललं असेल बरं? स्थळ काळ वेळ अतीघाई याव्यतिरक्त तिचा अप्रोच देखील चुकला. नंतर नंतर मला तिच्यात वेडसरपणाची झाक दिसू लागली आणि मग मला ती harrasment वाटू लागली. असो..

जिथं interests fullfill होत नाहीत तिथं आपलं awkwardness वाढतं अन् ते harassment कडे झुकू लागतं.

स्त्री असो वा पुरुष, वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाने आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे flirting करायचा प्रयत्न केलेला असतो, किंवा समोरच्याच्या flirting ने फीलगुड वाटून इगो तरी सुखावून घेतलेला असतो, किंवा flirting ला काही प्रमाणात अपवादात्मक का होईना acceptance दिलेला असतोच. जर कोणी व्यक्ती वरच्या कोणत्याच कॅटेगरीत बसत नसेल, तर अशी व्यक्ती Psychologically disturbed किंवा hormonally deprived असण्याची शक्यता जास्त आहे.

माझ्यासोबत कोणीच flirting करू शकत नाही किंवा करू धजत नाही, असं जर कोणी स्त्री/पुरुष म्हणत असतील, तर एकतर बॉडीलँग्वेज ने मूकसंमती देण्याच्या बाबतीत आपण कडक असू शकतो, किंवा आपल्यासोबत कोणाला flirt करू वाटावं अशा व्यक्तिमत्त्वाचे आपण नसू शकतो!

इतिहासात आणि पुराणात देखील Flirting चे कित्येक उल्लेख/दाखले आहेत. विषयाला वेगळे वळण मिळू नये म्हणून मी कृष्णाचं उदाहरण द्यायचं टाळतोय. पण सध्याच्या काळात तर ती “अरे बापरे!” असं react करण्याची गोष्ट उरलेली नाहीये.
कॉलेजेस मध्ये तर द्विअर्थी बोलणं आणि flirt यांचं प्रमाण खूप आहे. यात मुलींचं participation देखील ह्या फेसबुकवरच्या फेमिनाझी ताया विचारही करू शकणार नाहीत एवढं मोठं आहे.

समोरच्याची कॉमेंट आपण सहज घ्यावी, की ती आपल्याला harrassment वाटावी यात त्या व्यक्तीचे दिसणे (looks) खूप matter तर करतातच आणि प्रथमदर्शनी तोच सगळ्यात मोठा deciding factor असतो (“असतोच” असं नाही!), पण financial status वर देखील काही प्रमाणात ते ठरते. हे एवढ्या उघडपणे मी का म्हणालो कारण, मेडिकल कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना मी स्वतः पाहिलंय की, कित्येक स्टुडंट् नर्स, फिजिओथेरपीच्या मुली, डायटिशीयन कोर्सेसच्या मुली रेसिडेंट डॉक्टर मुलांसोबत सोबत खूप flirt करायच्या. एखादा flirt करणारा आणि handsome डॉक्टर असेल तर मग तर काय बोलायलाच नको! सगळ्याच मुली तसं करायच्या असं मी म्हणत नाहीये, पण प्रमाण मात्र लक्षणीय होतं, विशेषतः मुंबईच्या कॉलेजेस मध्ये. मग त्याखालोखाल पुणे नागपूर असायचं. त्यामानानं मराठवाड्यातील कॉलेजेस खूप मागास होती. हे मी पंधरा वर्षांपूर्वीचं सांगतोय, आता तर बऱ्याच छोट्या शहरांत आणि मेडिकल इंजिनिअरिंग व्यतिरिक्त इतरही व्यावसायिक कॉलेजेस मध्ये ह्या NSA relationship वाढल्या आहेत. (हे विधान मी पूर्ण होशो-हवास मध्ये करतोय!).

ONS असो किंवा FWB असो, यात तो/ती दिसायला कसा/कशी आहे, आणि “डेट” वर किती खर्च करेल यावर बरंच ठरतं. अन् यातलं काही जवळ नसणाऱ्याचं approach करणं तर दूरच पण बोलणं देखील harrassing वाटतं. म्हणजे वो करे तो रासलीला, और हम करे तो कॅरॅक्टर ढिला?

Financial position हा flirting आणि harrassment यात फरक करणारा मुद्दा आहे, हे विधान सरसकटीकरण करणारं आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर “financial position वर ते अजिबात अवलंबून नसतं”, असं म्हणणं देखील सरसकटीकरणच आहे.. आपण तसे नाहीत, किंवा आपल्या आजूबाजूचे वर्तुळ तसे नाही, म्हणजे तसं काही अस्तित्वातच नसतं, असं मानणं, म्हणजे कुपमंडुकता आहे..

पूर्वी एका banquette मध्ये एक जण आमच्या ग्रुपमधल्याच पण त्याला अनोळखी असलेल्या मुलीला you are looking sexy म्हणाला. ती थोडीशी offend झाली. नंतर तिने तो कोण आहे, काय करतो वगैरे समजल्यावर, “त्याची ओळख करून देतेस का?” असं त्याच्या common friend ला तिने विचारलं. म्हणजे एका complement कडून flirting कडे जाण्यासाठीची तिची मुकसंमती असली असती, अशी परिस्थिती तिथं निर्माण झाली होती.. पण समजा, जर ही सेम complement तिथल्या वेटर ने दिली असती, तर चाललं असतं का ते? काय बदलत होतं तिथे?

Financial status matter करत असल्याची कित्येक उदाहरणे hospital आणि travel च्या निमित्ताने मी पाहतोय. Hyatt regency च्या reception desk वर “You are looking nice in saree” या compliment नंतर , Sir, Our restaurant is here, our bar is there, give me a call if any kind of inconvenience you face, from where you are travelling, for business purpose or for vacation, what do you do and blah blah blah… असं छोटंसं गुफ्तगू मी ऐकलं.. पण सेम कॉमेंट तिथल्या गेटकिपरनं केली असती तर त्याची कम्प्लेंटच केली गेली असती.

दहा एक दिवसांपूर्वी मी फेसबुकवर याबद्दल एक one liner quote पोस्ट केले होते, त्यावरून बराच धिंगाणा घातला गेला. त्यात काही जणांनी आणि जणींनी फेमिनिझमचा मक्ता घेतल्याच्या आविर्भावात शस्त्रे उपसली. Oh my god, this is not expected from you, shame! Shame! I am blocking you, i am unfriending you वगैरे वगैरे..

त्यावरचा one liner वरचा सरसकटीकरणाचा (Generalisation) आरोप सोडला तर इतर कुठल्याच आरोपात तथ्य नाहीये. आणि या Generalisation चा आरोप तर इतका General आहे, की “नेहमी खरे बोलावे” या वाक्याला देखील हा Generalisation चा आरोप लावता येईल.

धन्यवाद..

– डॉ सचिन लांडगे.

**

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *