Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

Uncategorized

सहज –

  मी जर लिहिले की, “चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, हे चूक आहे”, तर माझ्या वर टीका होईल.   पण हे वाक्य खरंच चूक आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत नाही, तर ते दोघेही एका कॉमन barycentre भोवती फिरतात. चंद्रपृथ्वी जोडीच्या बाबतीत तो barycentre पृथ्वीच्या परिघाच्या आत आहे, म्हणून आपल्याला पृथ्वी स्थिर(चंद्राच्या सापेक्ष) तर चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय असं वाटतं. …

सहज – Read More »

भ्रष्टाचार …

  भ्रष्टाचार फक्त पैशांचाच नसतो.. भ्रष्टाचार विचारांचा, जाणिवांचा, आणि भावनांचाही असतो..   पूर्वी प्रथा-परंपरातून आणि कथा-कहाण्यांतून पिढ्यान् पिढ्या आपल्या वारसदारांच्या पोटापाण्याची आणि श्रेष्ठत्वाची सोय करून ठेवली गेली होती.. आताही इतिहासाच्या मोडतोडीतून, शिक्षणव्यवस्थेतून किंवा फसवे प्रचारतंत्र राबवणाऱ्या यंत्रणेतून, अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने लोकांच्या “विचार जाणिवाच” कोणी बदलत असतील, आणि आपले समविचारी लोकच कायम सत्तेत राहावेत, तेच लाभार्थी …

भ्रष्टाचार … Read More »

डोंबलाचे पुरोगामी –

  – डॉ सचिन लांडगे.   सध्याचे बहुतांश पुरोगामी हे स्वयंभू पुरोगामी नाहीत. ते स्वतःला पुरोगामी समजताहेत तर खरं, पण ते केवळ गेल्या शतकातल्या पुरोगामी समाजसुधारकांचे अनुयायी आहेत. आजच्या प्रश्नांची उत्तरे जुन्या पुस्तकांत शोधणे म्हणजे प्रतिगामीपणा. पुरोगामीपणा म्हणजे कालसुसंगतपणा. आजच्या प्रश्नांची उत्तरे आजच्या संदर्भाने (context) पुढचा विचार करून शोधणे म्हणजे पुरोगामीपणा.. पुरोगामीपणा म्हणजे काळाच्या बरोबरीने …

डोंबलाचे पुरोगामी – Read More »

जबाबदारी –

– डॉ सचिन लांडगे.   या बाबतीत जगात लोकांचे पाच प्रकार असतात…   १.  या पहिल्या प्रकारातल्या लोकांना स्वतःला काही करायचं नसतं, पण दुसऱ्याने करायला घेतलं की त्यात लुडबुड करायची सवय असते.. २. या प्रकारातल्या लोकांना सगळं स्वतःच करायची हौस तर असते. पण, त्यांना नीट येतही नसतं, अन् दुसऱ्याचं ऐकून घ्यायची तयारीही नसते.. फक्त केल्यासारखं …

जबाबदारी – Read More »

लग्न आणि ब्लडग्रुप …

  – डॉ सचिन लांडगे.   अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की.. लग्न ठरताना ब्लडग्रुप बघायचा असतो का? आणि त्याचा कितपत importance असतो वगैरे..   एक सांगतो, ब्लडग्रुपचा आणि लग्नाचा; पुढे मुलं होण्याचा किंवा न होण्याचा काही एक संबंध नाही..   होणाऱ्या नवरा बायकोचा ब्लडग्रुप एक असला काय किंवा वेगळा वेगळा असला काय, सगळं सारखंच.. …

लग्न आणि ब्लडग्रुप … Read More »

सुप्रीम कोर्टाने तब्बल दोन आठवडे नाताळची सुट्टी घेतलीये स्वतःला..

सुप्रीम कोर्टाने तब्बल दोन आठवडे नाताळची सुट्टी घेतलीये स्वतःला..   “स्वतःलाच” म्हणावं लागेल.. आमदार खासदार जसं स्वतःच स्वतःचा पगार वाढवायचं विधेयक आणतात, अन् ते एका मिनिटात पारित देखील करण्यात येते. तसंच आहे हे..   सरकारी रुग्णालयात जेवढे पेशन्ट एका वेळी ऍडमिट असतात त्यांच्या कितीतरी पटीने जास्त कोर्टात केसेस पेंडिंग आहेत.. लोकांच्या आशा लागल्यात त्या निर्णयांवर.. …

सुप्रीम कोर्टाने तब्बल दोन आठवडे नाताळची सुट्टी घेतलीये स्वतःला.. Read More »

प्रिय जी ए –

आज जी एं चा स्मृतिदिन. 1923 ते 1987 पर्यंतचे आयुष्य आणि 50 ते 70च्या दशकातले ते लेखक आहेत.   गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ “जीए” नावाचं वादळ माझ्या “वाचन आयुष्यात” जरा लवकरच आलं.. लवकरच आलं यासाठी की, मी नुकतीच मृत्युंजय, स्वामी, पानिपत अशी ऐतिहासिक पुस्तकांची इयत्ता पार केली होती, आणि फडके, खांडेकर, पुलं, वपु वगैरे भेटायच्या …

प्रिय जी ए – Read More »

पुरुषांचा विचार करताना – (भाग १)

  – डॉ सचिन लांडगे.   आज Mens Day आहे. पुरुषांनीच नियम बनविलेल्या, पुरुषांचेच वर्चस्व असलेल्या या पुरुषांच्याच जगात पुरुषांना पुरुष असल्याबद्दल शुभेच्छा द्यायची काही गरज आहे का? असा प्रश्न काही जणांना अन् जणींना पडू शकतो. अशांसाठी ही लेख मालिका –   पुरुषांच्या समस्यांचा विचार करताना या विषयाचे तीन भाग केले आहेत.   1. पहिल्या …

पुरुषांचा विचार करताना – (भाग १) Read More »

पुरुषांच्या बाजूने विचार करताना – (भाग २ )

  – डॉ सचिन लांडगे.   पुरुषदिनानिमित्त लिहिलेल्या लेखमालिकेतल्या ह्या दुसऱ्या भागात “नवऱ्याला छळणाऱ्या बायका” याविषयावर सविस्तर चर्चा केली आहे. लेखाचा स्कोप तेवढाच आहे. कित्येक स्त्रिया पुरुषसत्ताकतेच्या बळी असतात यावर कोणाचंही दुमत नसेलच, पण कित्येक पुरुष देखील स्त्रीच्या रोजच्या कटकटींनी ग्रस्त असतात, हेही तितकंच वास्तव आहे. पुरुषांवर होणारे स्त्रीअत्याचार, ही गोष्ट समजून घेणे, यावर बोलणे …

पुरुषांच्या बाजूने विचार करताना – (भाग २ ) Read More »

पुरुषांचा विचार करताना – भाग ३

  – डॉ सचिन लांडगे. पुरुषदिनानिमित्त “पुरुषांचा विचार करताना” या सदराखाली लिहिलेल्या तीन भागाच्या मालिकेतील हा शेवटचा भाग. पहिल्या भागात पुरुष असण्याचे काय काय त्रास असतात याबद्दल लिहिले आहे. दुसऱ्या भागात पुरुषाला त्याच्या बायकोकडून होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा केली आहे. तर या तिसऱ्या भागात पुरुषांना इतर स्त्रियांकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्रासाबद्दल किंवा त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या अन्यायाबद्दल …

पुरुषांचा विचार करताना – भाग ३ Read More »