रॉन्ग नंबर –
– डॉ सचिन लांडगे. प्रत्येक डॉक्टरच्या ओपीडीत असे कित्येक पेशंट येत असतात ज्यांच्याकडे जाडजूड फाईल्स, आणि त्रस्त चेहरा असतो. त्या सगळ्या फाईल्स टेबलावर ठेऊन ते (किंवा सोबत आलेले नातेवाईक) सुरू करतात – हा त्रास आहे, तो त्रास आहे, या डॉक्टरला दाखवलं, फरक नाही पडला, त्या डॉक्टरला दाखवलं गुण नाही आला, अमुक तपासण्या केल्या, …