Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

पालकत्व

पालकत्वाच्या नोंदी भाग ५ –

  – डॉ सचिन लांडगे.   प्रत्येक मुलाला अन मुलीला स्वावलंबनाचे धडे लहान वयातच दिले पाहिजेत.. पूर्वी फक्त मुलीलाच घरातली कामे शिकवत आणि मुलांना बाहेरची.. पण आता दोघांनाही घरातली बाहेरची असा भेदभाव न करता दोन्ही प्रकारची कामे शिकवली पाहिजेत.   प्रत्येक मुलाला अन मुलीला- (जरी घरात नोकर असतील तरीही) खालील गोष्टी करायला लावाव्यात..   १. …

पालकत्वाच्या नोंदी भाग ५ – Read More »

पालकत्वाच्या नोंदी भाग ४

लहान मुलं खूप स्वार्थी असतात, त्यांना ज्या गोष्टी हव्या असतात त्या मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जातात.. लहान मुलांच्या डोक्यात कायम त्यांना आनंद देणाऱ्या, त्यांना त्याक्षणी हव्या असणाऱ्या, गोष्टींचेच विचार घोळत असतात (Pleasure principle).. आणि त्यांना हव्या असणाऱ्या त्या गोष्टी मिळविण्यासाठी ती तुमच्याबरोबर भांडण, राग, आदळआपट आणि प्रसंगी नाटकी प्रेमही करू शकतात.. हळू हळू त्यांना माहिती …

पालकत्वाच्या नोंदी भाग ४ Read More »

पालकत्वाच्या नोंदी भाग ३

“माझं अमुक काम कर, मी तुला चॉकलेट देईन”, किंवा, “तू एवढा अभ्यास कम्पलिट केलास तर मग मी तुला जास्त वेळ खेळू देईन” , अशी आमिषे दाखवायचे फालतू प्रकार तर मी कधीच केले नाहीत..चॉकलेट/कॅडबरी कधीमधी मुक्ताला घेऊन दिलीय.. पण सहजच.. कुठलं आमिष, किंवा कशाचं बक्षीस म्हणून नव्हे.. तसंच, मुलांना खेळू द्यायचं, ते अभ्यास केल्याचं बक्षीस म्हणून …

पालकत्वाच्या नोंदी भाग ३ Read More »

पालकत्वाच्या नोंदी भाग २

मुक्ता अगदी एक वर्षाची असल्यापासून मला आठवतंय तसं आम्ही तिला तिचा हट्ट पुरवून घेण्यासाठी “रडणं” ही गोष्ट वापरू दिलेली नाही.. तिनं एखाद्या गोष्टीचा किंवा वस्तूचा हट्ट धरला आणि त्यासाठी ती रडू लागली, तर “आधी रडणं थांबव, तरच आम्ही तुला ती वस्तू (किंवा खेळणं) देऊ”, किंवा “तरच तुला उचलून कडेवर घेऊ” , असंच म्हणत सवय लावायचा …

पालकत्वाच्या नोंदी भाग २ Read More »

पालकत्वाच्या नोंदी भाग १

मुक्ता अगदी लहान असतानाही जेंव्हा खुर्चीला किंवा टेबलाला धडकायची आणि रडायची, तेंव्हा तिला शांत करण्यासाठी आम्ही कधीच त्या टेबलखुर्चीला ‘हात’ करत खोटं-खोटं मारलं नाही, किंवा ‘का रे आमच्या मुक्कु ला मालता!’ असं म्हणत त्या टेबलखुर्चीवर लटकेच रागावलो नाही..उलट त्या रांगत्या वयापासूनच, “मुक्कुबाळानं खुर्ची नीट पाहिली नाही म्हणून मुक्कुबाळ तिला धडकलं, हो ना! आता पुढच्या वेळी …

पालकत्वाच्या नोंदी भाग १ Read More »

मी जात टाकली, मी कात टाकली…मी किडक्या समाजव्यवस्थेची आता लाज टाकली..

आज 02 एप्रिल.. माझ्या मुलीच्या पहिल्या इयत्तेचा पहिला दिवस..मी स्वतःच निधर्मी असल्याने मी तिच्याही शाळेच्या फॉर्ममध्ये जात आणि धर्म दोन्हीही लिहिले नाही.. आधी धर्म मानवता (ह्यूमॅनिटी) आणि जात भारतीय लिहायचा विचार केला होता.. पण नंतर ते कॉलम रिकामे ठेवण्याचं ठरवलं.. धर्म आणि जात हे कन्सेप्टच नकोत असं वाटलं..शाळेत हे सांगितल्यावर त्यांनी परस्परात चर्चा करून त्यासाठी …

मी जात टाकली, मी कात टाकली…मी किडक्या समाजव्यवस्थेची आता लाज टाकली.. Read More »