Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

वैद्यकीय क्षेत्र

बुलशिट..

  – डॉ सचिन लांडगे.   पॅरॅलीसिस पासून कॅन्सर पर्यंत सगळं बरं करणारा सॅबिस्टीन असो, किंवा होली वॉटर पाजणारे पाद्री असो.. बिना ऑपरेशन कॅन्सर निकाल देनेवाले उलेमा सुलेमा असोत किंवा कोणी दळभद्री बाबा बुवा असो.. कोणी का असेना, माझं म्हणणं आहे, यांनी काहीपण गंडे दोरे बांधावे, कसलंही मंतरलेलं पाणी पाजावे, आणखी कोणतीही भिकरचोटगिरी करावी, पण …

बुलशिट.. Read More »

झोलाछाप औषधविके –

  – डॉ सचिन लांडगे.   या सोबत दिलेल्या व्हिडीओ मध्ये किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीला, एका स्वयंघोषित (non degree holder) वैद्याने औषध दिले आणि त्या बाईंच्या भावाच्या (पेशंटच्या) सगळ्या व्यथा दूर झाल्या.. असा हा व्हिडीओ आहे.. यात त्या बाईंनी आणि त्या वैद्याने स्वतःचा मोबाईल नंबर दिला आहे, आणि किडनी विकारापासून ते कॅन्सर पर्यंत सगळे …

झोलाछाप औषधविके – Read More »

शस्त्रपूजन

मला 2006चा दसरा आठवतोय.. माझी रेसिडेन्सी चालू होती. गायनॅक पोस्टिंग असल्याने ऑपरेशन थिएटर (ओटी) मध्ये पूजेसाठी अनेस्थेसिया आणि गायनॅकचे सगळे डॉक्टर्स हजर होते..ओटी स्वच्छ केली होती, काही थोडे instruments आणि ठराविक machines स्टराईल एरियातून बाहेर काढून पूजेसाठी सजवले होते.. उदबत्ती आणि फॉर्मलीन चा एकत्रित वास हवेत दरवळत होता.. आम्ही सगळे उत्साहित होतो, गप्पा आणि चेष्टामस्करीला …

शस्त्रपूजन Read More »

डॉक्टर आणि हॉस्पिटल – समज गैरसमज…

आज डॉक्टर्स डे च्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्राबद्दल समाजात असलेले गैरसमज आणि अज्ञान दूर करण्याच्या दृष्टीने, वैद्यकीय व्यवसायाबद्दल समाजाच्या असणाऱ्या प्रमुख आक्षेपांबद्दल डॉक्टरांची बाजू मांडण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न..यात ,१. एकूणच मेडिकल सायन्स बद्दल आपल्यात असणारे अवाजवी अपेक्षा आणि गैरसमज..२. कॉम्प्लिकेशन्स (गुंतागुंत) आणि निगलिजन्स (निष्काळजीपणा) मधील फरक..३. दोन हॉस्पिटलमधल्या उपचाराच्या बिलात तफावत का असते?४. हॉस्पिटल्समध्ये उपचारांचे …

डॉक्टर आणि हॉस्पिटल – समज गैरसमज… Read More »

आजारी समाज आणि विकारी समज..

“आजार एक आणि डॉक्टर अनेक” या शीर्षकाखाली आलेला लेख मी नुकताच वाचला, आणि खूप हसलो.. पण जेव्हा तो लेख एका प्राध्यापिकेने लिहिला आहे हे दिसले तेंव्हा मात्र मी सुन्न झालो.. आणि या अस्वस्थतेने मला हा लेख लिहायला प्रवृत्त केले..इतका वैद्यकीयदृष्ट्या हास्यास्पद लेख आपल्या समाजातली एक प्राध्यापिका लिहीत असेल आणि आपल्या समाजातल्या एका उच्चशिक्षित व्यक्तीची मेडिकल …

आजारी समाज आणि विकारी समज.. Read More »

जेनेरिक औषधांचे वास्तव आणि धोके…

 – डॉ सचिन लांडगे.   “जेनेरिक औषधं स्वस्त पडतात आणि आपल्या देशातल्या करोडो गरिबांची पहिली पसंती बनू शकतात” ही खरंच चांगली गोष्ट आहे.. पण ज्या देशात सगळ्या मॉनिटरी सिस्टिम्स भ्रष्ट आहेत तिथं मात्र ही गोष्ट स्वप्नवतच् राहते.. एकदा एका लोकल जेनेरिक कंपनीने अँटीबायोटिक्सच्या कॅप्सूल्समध्ये zinc phosphide (उंदीर मारायचं विष) चुकून भरलं होतं.. (कारण त्याच कंपनीचा …

जेनेरिक औषधांचे वास्तव आणि धोके… Read More »

मेडिकल फिल्ड विषयीचे अज्ञान की डॉक्टरांविषयीचा आकस..?

अलीकडे मी सोशल मीडियावर पाहतो आहे.. कुणीही एखादा त्याला आलेल्या कुठल्यातरी डॉक्टरविषयीच्या वाईट अनुभवाबद्दलची पोस्ट टाकतो.. आणि मग त्याच्या पोस्टवर कॉमेंट्स चा पाऊस पडतो.. “लुटतात साले” इथपासून ते “सगळे चोर आहेत, यांना फटके मारा” इथपर्यंत लोकांची मुक्ताफळे असतात.. प्रत्येकजण आपापली मळमळ आपापल्या संस्कारानुसार बाहेर काढत असतो..ज्याने मूळ पोस्ट टाकली आहे त्याचा अनुभव बऱ्याचदा पूर्वग्रहदूषित असतो, …

मेडिकल फिल्ड विषयीचे अज्ञान की डॉक्टरांविषयीचा आकस..? Read More »

डॉक्टर लोक डिपॉझिट का भरून घेत असतील..?

डॉक्टर काय लागतील ते उपचार करा, आम्ही पैसे देऊ.. पण सध्या आमच्याकडे नाहीत.. आम्ही काय पळून चाललोय का?!! हे डायलॉग डॉक्टरांसाठी नेहमीचेच असतात..कारण, आपल्या देशात “आरोग्यासाठी” पैसे बाजूला काढून ठेवण्याची पद्धतच नाही.. जेणेकरून कधीही लागल्यास लगेच ATM मधून काढता येतील.. मग विमा (मेडिक्लेम) असणं तर दूरची गोष्ट आहे..अचानक काही उद्भवलं की लगेच पळापळ सुरू होते..बरं.. …

डॉक्टर लोक डिपॉझिट का भरून घेत असतील..? Read More »

प्रवासी आणि नावाडी..

    – डॉ सचिन लांडगे.   एक जुनी गोष्ट आहे. आपण खूपदा वाचली असेल.. एकदा एक *प्रवासी* त्याच्या छोट्या बोटीतून नदी ओलांडत असतो. अचानक त्याची बोट खडकावर आपटून फुटते व प्रवासी पोहता येत नसल्याने पाण्यात गटांगळ्या खाऊ लागतो..   *भाग एक -*   प्रवासी वाचवा वाचवा म्हणून जोरजोरात ओरडू लागतो. त्याचा आरडाओरडा ऐकून एक …

प्रवासी आणि नावाडी.. Read More »

आयुर्वेद आणि त्याचे भवितव्य…

  – डॉ सचिन लांडगे. जेंव्हापासून मानव विचार करू लागला तेंव्हापासून निरीक्षणातून तो शिकत गेला. आयुर्वेदाला माणूस विचार करू लागल्यापासूनची परंपरा आहे.. आपल्या थोर ऋषी मुनींनी हजारों वर्षांपासून वनस्पतींच्या गुणधर्मांचा अभ्यास करून, त्या काढे भस्मे चूर्ण या व अशा अनेक स्वरुपात औषधे म्हणून वापरायला सुरुवात केली कालांतराने अनेकानेक वनस्पतींचा वापर व त्यांची मिश्रणे त्यांचे जास्तीतजास्त …

आयुर्वेद आणि त्याचे भवितव्य… Read More »