मैत्री
मैत्री.. मैत्री दिनाच्या शुभेच्छा देणारे खूप मेसेज आले सकाळी सकाळी.. मग मला पूर्वी व्हाट्सएपवर आलेला एक जोक आठवला..नवरा बायकोत मित्रांवरून भांडण होते. बायको म्हणते तुमचे मित्र बिनकामाचे आहेत, एकपण धड नाही..मग नवरा म्हणतो, चल टेस्ट करू..तो बायकोच्या पाच मैत्रिणींना फोन करतो, आणि प्रत्येकीला विचारतो, “आमची ही रात्रीपासून घरी आली नाही, कुठे गेली काही माहिती आहे …