Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

नास्तिकता

भातुकली –

लहान मुलं बाहुला-बाहुलीचा खेळ खेळतात. त्यांना न्हाऊमाखू घालतात, खाऊ घालतात, झोपवतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांच्यावर लटके रागावतात, बाहुल्या पण त्यांच्याशी बोलत असल्याचं नाटक करतात. असं करता करता त्यांच्या बाहुल्या ह्या त्यांच्या भावविश्वाचा भागच बनतात/असतात. त्यातून त्यांना आधार मिळतो, समाधान मिळतं.. लहान मुलांत Analyatical (Critical) thinking कमी असते. हळू हळू त्याचा विकास होतो. यालाच आपण “समज येणे” …

भातुकली – Read More »

ट्रॅडिशन

मी MBBS ला असताना, ‘ट्रॅडिशनल डे’ च्या दिवशी माझा एक मित्र पोतराजाचा पोशाख घालून आला होता.. समोर येऊन प्रत्येकाने दोन शब्द बोलायचे होते.. तेंव्हा तो मित्र म्हणाला, “हे पोतराज, कडकलक्ष्मी, वासुदेव, ही आपली संस्कृती आहे.. ती टिकली पाहिजे, म्हणून मी हा वेष निवडला”.. मी त्याला नंतर म्हणालो, “एवढीच तुला काळजी आहे, तर मग तुझ्या मुलाला …

ट्रॅडिशन Read More »

अकलेची हळद, अन परंपरेचं कुंकू..

संक्रांतीनंतर या हळदीकुंकू कार्यक्रमांचं घरोघरी अन गल्लीबोळात पेव फुटतं.. आता तर नगरसेवक अथवा भावी नेते आपापल्या वार्डात याचं घाऊक आयोजन करताना दिसतात..“नवरा असणे” हाच केंदबिंदू मानून बाईचं मूल्यमापन करण्याच्या उठाठेवीचं, ते वरवर निरुपदवी वाटणारं, पण ‘कुरूप’ रूप आहे. एरवी बायामाणसांना कवडीइतकं मोल नसणाऱ्या आपल्या समाजात, ‘नवरा असलेल्या बाईला’ (त्यातल्या-त्यात) जी थोडीफार किंमत दिली जाते त्याचाच …

अकलेची हळद, अन परंपरेचं कुंकू.. Read More »

थोडक्यात सांगायचे म्हणजे –

धर्म आणि धर्मग्रंथांनी पूर्वीच्या काळी खूप महत्वाचे काम बजावले आहे.. समाजव्यवस्था कशी असावी? दुसऱ्याला त्रास न होता कसे वागावे? न्यायनिवडा कसा करावा? नीतीने वागणे म्हणजे काय? खरं खोटं म्हणजे काय? चांगलं वाईट कसं ठरवायचं? असे नैतिक प्रश्न त्याकाळी धर्म सोडवत असे …तेंव्हाच्या उपलब्धतेनुसार आणि निसर्गानुसार पेहराव कसा असावा, स्त्री-पुरुषांनी काय घालावे, याचेही नियम धर्मच बनवत …

थोडक्यात सांगायचे म्हणजे – Read More »

धार्मिक स्त्रिया आणि त्यांचा फुसका फेमिनिझम..

ज्या वयात मुलींना हिजाब म्हणजे काय माहित नसतं, त्या वयापासून कित्येक ‘आया’ आपल्या मुलींना तो घालायला लावतात, त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स घेऊन देतात. जणू ते आभूषण आहे असं ‘फॅशन स्टेटमेंट’ त्याभोवती निर्माण करतात.. मग त्या मुलीची आपोआपच ती ‘आवड’ बनून जाते..अगदी लहानपणापासून मुलींना घेऊन “हळदी-कुंकू” वगैरे सारखे धडे गिरवताना कित्येक आया दिसतात.. वर वटसवित्री अन हरतालिका …

धार्मिक स्त्रिया आणि त्यांचा फुसका फेमिनिझम.. Read More »

अडचणीचे दहा प्रश्न..

– डॉ सचिन लांडगे.   १. तुम्ही एखाद्या धर्माला मानता त्याच्या देवाला मानता, म्हणजे तुम्ही इतर धर्माचे नास्तिक असता, हे तुम्हाला माहिती आहे का?.. आणि त्या इतर धर्मात नास्तिकांना नरकात ज्या शिक्षा लागू आहेत त्या तुम्हाला पण लागू आहेत, याबाबत तुमचं मत काय आहे?   २. “ला इलाहा इल्लल्लाह” याचा अर्थ ‘अल्लाह एकच ईश्वर आहे, …

अडचणीचे दहा प्रश्न.. Read More »

अस्तिकांची ‘भावना काकू’ का दुखावते?

“भावना” हा खूप मोठा प्रांत आहे. तो एकट्या आस्तिकांचा प्रांत नाही. पण समाजानं असं घाबरून त्यांचा ‘प्रांत’ करून दिलाय. कारण ते मग लहान मुलासारखं चिडून-रडून हिंसक होतात.सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं उन्मादीच् असतं, सतत कानावर स्पीकर अन् डीजेचा ध्वनीमैथुन होत असतो, गल्ली बोळं रस्ता काही काही म्हणून सोडत नाहीत.. आणि यावर बोलावं तर भावना दुखावतात …

अस्तिकांची ‘भावना काकू’ का दुखावते? Read More »

“मानसिक आधारासाठी ईश्वर”..??

माझ्यासभोवती कित्येक श्रद्धावान लोक आहेत ज्यांच्याकडे तर्कावर जगण्याइतकी विचारक्षमता आणि त्याद्वारे तयार होणारी सारासार विवेकबुद्धी नाही.. जीवन व्यतीत करण्यासाठी कशावर तरी ‘श्रद्धा’ ठेवणे ही त्यांची मानसिक गरज आहे.. अशा लोकांचा ईश्वररूपी आधार काढून घेतला तर त्यांचं जगणं असह्य होईल, असं मला नेहमी सुचवलं जातं..ईश्वर अस्तित्वात आहे की नाही हे एकवेळ बाजूला ठेऊयात.. पण लोकांच्या मनात …

“मानसिक आधारासाठी ईश्वर”..?? Read More »

सूर्य पाहिलेला माणूस –

  – डॉ सचिन लांडगे.   तारीख ३ एप्रिल १९९४.. मी नववीत होतो.. तेंव्हा आमच्याकडं ‘तरुण भारत’ यायचा.. त्याच्या रविवारच्या पुरवणीत लेख वाचला – ‘आता परमेश्वरालाच रिटायर्ड करा’.. लेखक होते श्रीराम लागू!   एवढा मोठा लेख पूर्ण वाचला.. माझी बौध्दिक पातळी चौदा वर्षांइतकीच! त्यात मन पूर्ण आस्तिक.. घरातल्या देवपूजेसाहित सगळे सोपस्कार मन लावून जिव्हाळ्याने करण्याचं …

सूर्य पाहिलेला माणूस – Read More »

“सोनू, तुला भरोसा नाय काय ?”

सोनू च्या घरी गणपती आला. त्याने मनोभावे पूजा केली,मित्रांना, नातेवाईकांना घरी बोलावले,प्रसाद दिला. सण चांगला साजरा केला.त्यानंतर तो दगडूशेठ चे दर्शन घेण्यासाठी गेला.. धक्के खात कसे तरी दगडूशेठ गणपती चे दर्शन घेतले..आणि थकून भागून घरी आला …तेव्हा घरचा गणपती त्याला म्हणाला ..“सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाय काय ?”सोनू लाजला, पण बदलला नाही..अहो, मंडळातल्या गणपती समोर …

“सोनू, तुला भरोसा नाय काय ?” Read More »