Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

सर्व

वैद्यकीय व्यवसाय – काल , आज आणि उद्या.. (भाग २)

पुढचा मुद्दा म्हणजे, पूर्वीपेक्षा आज समाजातही खूप बदल झाले.. हळूहळू व्यवसाय करण्यामागील हेतू ‘पैसे कमावणे’ हा होऊ लागला.. कारण समाजातील व्यक्तीची ‘पत’ ही त्याच्या ज्ञान अथवा कौशल्यावरून न ठरता ती पैशावरून ठरू लागली. मग याला डॉक्टर तरी अपवाद कसे ठरणार?डॉक्टरांमध्ये देखील ‘पैसे कमावणे’ ही भावना वाढीस लागू लागली आणि तिथूनच ख-या अर्थाने वैद्यकीय पेशातील ‘मालप्रॅक्टिसेस’ना …

वैद्यकीय व्यवसाय – काल , आज आणि उद्या.. (भाग २) Read More »

वैद्यकीय व्यवसाय – काल आज आणि उद्या..(भाग ३)

लोकांच्या मनात वैद्यकीय क्षेत्राविषयी संशय आणि राग आहे, आणि त्यामुळे डॉक्टर पेशंट यांच्या नात्यातली दरी रुंदावत चालली आहे, त्यावर प्रामुख्याने चार उपाय मला सुचवावेसे वाटतात..१. समाज वैद्यक साक्षर बनविणे.. (हा मुद्दा आपण गेल्या भागात पाहिलाय)..२. शिक्षणासाठी, घरासाठी, मुलीच्या लग्नासाठी जसं पैशाची तजवीज करतो, किंवा पैसे बाजूला काढून ठेवतो, तसं आजारपण आणि ऑपरेशनसाठी पण तजवीज करायला …

वैद्यकीय व्यवसाय – काल आज आणि उद्या..(भाग ३) Read More »

अकलेची हळद, अन परंपरेचं कुंकू..

संक्रांतीनंतर या हळदीकुंकू कार्यक्रमांचं घरोघरी अन गल्लीबोळात पेव फुटतं.. आता तर नगरसेवक अथवा भावी नेते आपापल्या वार्डात याचं घाऊक आयोजन करताना दिसतात..“नवरा असणे” हाच केंदबिंदू मानून बाईचं मूल्यमापन करण्याच्या उठाठेवीचं, ते वरवर निरुपदवी वाटणारं, पण ‘कुरूप’ रूप आहे. एरवी बायामाणसांना कवडीइतकं मोल नसणाऱ्या आपल्या समाजात, ‘नवरा असलेल्या बाईला’ (त्यातल्या-त्यात) जी थोडीफार किंमत दिली जाते त्याचाच …

अकलेची हळद, अन परंपरेचं कुंकू.. Read More »

जातीयवाद

जळगाव जिल्ह्यातील जामनेर प्रकरण. यात मारणारा जोशी म्हणजे “ब्राह्मण” असे समजून आधी आलेल्या प्रतिक्रिया आणि तो ब्राह्मण नव्हे, तर भटक्या-विमुक्त समाजातलाच होता हे समजल्यावर आलेल्या प्रतिक्रिया, या दोन्ही प्रतिक्रिया विकृत आहेत.. प्रत्यक्ष घटनेपेक्षा या विकृत प्रतिक्रिया जास्त विखारी आणि संतापजनक आहेत. समाजाची जातीयवादी कीड किती खोलवर आहे ते दाखविणाऱ्या आहेत.. पोहायला गेलेल्या तीन मुलांपैकी दोन …

जातीयवाद Read More »

जळणारे काजवे –

  – डॉ सचिन लांडगे.   काही लोक काजव्यासारखे असतात. सतत जळत असते त्यांची.. आपल्या आजूबाजूला खूप लोक वरून शांत असतात/दिसतात पण आतून ते बरेच फ्रस्ट्रेटेड असतात. एकतर नोकरी व्यवसायाच्या फ्रंट वर पीडित असतात, आर्थिकदृष्ट्या पीडित असतात किंवा कौटुंबिक फ्रंट वर खचलेले असतात, किंवा लैंगिक कुपोषित तरी असतात. असे फ्रस्ट्रेटेड लोक नंतर नंतर विकृत बनत …

जळणारे काजवे – Read More »

स्त्रीला काय हवं असतं?

  – डॉ सचिन लांडगे.   पैसा, प्रेम, संसारसुख, मुलंबाळं, ऐशोआराम, सत्ता की आणखी काय? पतीपैशावर मजा मारणाऱ्या अन बघत दिवसभर लोळत पडणाऱ्या स्त्रियांबद्दल बोलत नाहीये मी.. केवळ चांगलं स्थळ मिळविण्यासाठीच डिग्री घेतलेल्या अन लग्नानंतर पतीसेवेत लीन होत स्वत्व हरवलेल्या स्त्रियांबद्दलही बोलत नाहीये मी.. जिला थोडीतरी सजग जाणीव आहे, चांगल्या वाईटाचं तारतम्य आहे आणि जिच्यात …

स्त्रीला काय हवं असतं? Read More »

थोडक्यात सांगायचे म्हणजे –

धर्म आणि धर्मग्रंथांनी पूर्वीच्या काळी खूप महत्वाचे काम बजावले आहे.. समाजव्यवस्था कशी असावी? दुसऱ्याला त्रास न होता कसे वागावे? न्यायनिवडा कसा करावा? नीतीने वागणे म्हणजे काय? खरं खोटं म्हणजे काय? चांगलं वाईट कसं ठरवायचं? असे नैतिक प्रश्न त्याकाळी धर्म सोडवत असे …तेंव्हाच्या उपलब्धतेनुसार आणि निसर्गानुसार पेहराव कसा असावा, स्त्री-पुरुषांनी काय घालावे, याचेही नियम धर्मच बनवत …

थोडक्यात सांगायचे म्हणजे – Read More »

धार्मिक स्त्रिया आणि त्यांचा फुसका फेमिनिझम..

ज्या वयात मुलींना हिजाब म्हणजे काय माहित नसतं, त्या वयापासून कित्येक ‘आया’ आपल्या मुलींना तो घालायला लावतात, त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स घेऊन देतात. जणू ते आभूषण आहे असं ‘फॅशन स्टेटमेंट’ त्याभोवती निर्माण करतात.. मग त्या मुलीची आपोआपच ती ‘आवड’ बनून जाते..अगदी लहानपणापासून मुलींना घेऊन “हळदी-कुंकू” वगैरे सारखे धडे गिरवताना कित्येक आया दिसतात.. वर वटसवित्री अन हरतालिका …

धार्मिक स्त्रिया आणि त्यांचा फुसका फेमिनिझम.. Read More »

प्यार का पंचनामा भाग २

Companionate Love – सोबती प्रेम –हे असं प्रेम आहे, ज्या प्रेमात दाट सख्य किंवा जवळीक असते, आणि वचनबद्धताही असते.Companionship म्हणजे Intimacy + commitment .हे सोबती प्रेम कुठं कुठं दिसतं? म्हातारपणी जोडप्यात असं प्रेम असू शकतं.. इथं शारीरिक उत्कटता संपलेली असते, पण दाट जवळीक, शेअरिंग, केअरिंग, आणि जबाबदारी असते.. कुटुंबातील एकमेकांबद्दल ओढ आपुलकी असणारी सगळी नाती …

प्यार का पंचनामा भाग २ Read More »

विविधतेतून एकता –

  “आर्याबाग सांस्कृतिक परिवार” या समाजभान असलेल्या कलास्पर्शी व्यक्तींच्या ग्रुप तर्फे काढण्यात आलेल्या “आर्याबाग” या वर्षारंभ विशेषांकात प्रकाशित झालेला माझा एक लेख –   – डॉ सचिन लांडगे. आज भारताची लोकसंख्या दिडशे कोटी च्या जवळपास जात आहे. जगात एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात इतकी विविधता (Diversity) देखील इतकी आहे की सर्वसामान्यांना याची कल्पना देखील करता येत …

विविधतेतून एकता – Read More »