Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

सर्व

मेडिकल फिल्ड विषयीचे अज्ञान की डॉक्टरांविषयीचा आकस..?

अलीकडे मी सोशल मीडियावर पाहतो आहे.. कुणीही एखादा त्याला आलेल्या कुठल्यातरी डॉक्टरविषयीच्या वाईट अनुभवाबद्दलची पोस्ट टाकतो.. आणि मग त्याच्या पोस्टवर कॉमेंट्स चा पाऊस पडतो.. “लुटतात साले” इथपासून ते “सगळे चोर आहेत, यांना फटके मारा” इथपर्यंत लोकांची मुक्ताफळे असतात.. प्रत्येकजण आपापली मळमळ आपापल्या संस्कारानुसार बाहेर काढत असतो..ज्याने मूळ पोस्ट टाकली आहे त्याचा अनुभव बऱ्याचदा पूर्वग्रहदूषित असतो, …

मेडिकल फिल्ड विषयीचे अज्ञान की डॉक्टरांविषयीचा आकस..? Read More »

डॉक्टर लोक डिपॉझिट का भरून घेत असतील..?

डॉक्टर काय लागतील ते उपचार करा, आम्ही पैसे देऊ.. पण सध्या आमच्याकडे नाहीत.. आम्ही काय पळून चाललोय का?!! हे डायलॉग डॉक्टरांसाठी नेहमीचेच असतात..कारण, आपल्या देशात “आरोग्यासाठी” पैसे बाजूला काढून ठेवण्याची पद्धतच नाही.. जेणेकरून कधीही लागल्यास लगेच ATM मधून काढता येतील.. मग विमा (मेडिक्लेम) असणं तर दूरची गोष्ट आहे..अचानक काही उद्भवलं की लगेच पळापळ सुरू होते..बरं.. …

डॉक्टर लोक डिपॉझिट का भरून घेत असतील..? Read More »

प्रवासी आणि नावाडी..

    – डॉ सचिन लांडगे.   एक जुनी गोष्ट आहे. आपण खूपदा वाचली असेल.. एकदा एक *प्रवासी* त्याच्या छोट्या बोटीतून नदी ओलांडत असतो. अचानक त्याची बोट खडकावर आपटून फुटते व प्रवासी पोहता येत नसल्याने पाण्यात गटांगळ्या खाऊ लागतो..   *भाग एक -*   प्रवासी वाचवा वाचवा म्हणून जोरजोरात ओरडू लागतो. त्याचा आरडाओरडा ऐकून एक …

प्रवासी आणि नावाडी.. Read More »

आयुर्वेद आणि त्याचे भवितव्य…

  – डॉ सचिन लांडगे. जेंव्हापासून मानव विचार करू लागला तेंव्हापासून निरीक्षणातून तो शिकत गेला. आयुर्वेदाला माणूस विचार करू लागल्यापासूनची परंपरा आहे.. आपल्या थोर ऋषी मुनींनी हजारों वर्षांपासून वनस्पतींच्या गुणधर्मांचा अभ्यास करून, त्या काढे भस्मे चूर्ण या व अशा अनेक स्वरुपात औषधे म्हणून वापरायला सुरुवात केली कालांतराने अनेकानेक वनस्पतींचा वापर व त्यांची मिश्रणे त्यांचे जास्तीतजास्त …

आयुर्वेद आणि त्याचे भवितव्य… Read More »

सरकारवर टीका आणि तुमचा राग

मी जेव्हा मोदी सरकारवर टीका करतो तेंव्हा काही लोक श्वानासारखे वसकन अंगावर येतात.. बऱ्याच वेळा आपण दुर्लक्ष करतो पण कधी कधी त्या दुर्लक्षाचा अर्थ ते एकतर आपला नेभळटपणा किंवा त्यांचा विजय वगैरे समजून स्वतःतच खुश होतात.. आणि आजूबाजूचे चार चिअर लिडर्स जमा करून स्युडो आत्मसमाधान मिळवतात.. असो.. मिळवोत बापडे.. अहो, सरकार फक्त एक सेवा पुरवणारी …

सरकारवर टीका आणि तुमचा राग Read More »

धर्म आणि धर्मांधता

अख्खी दुनिया चंद्रावर जाईल.. पण हे धार्मिक लोक अजून गुहेतच राहायचा हट्ट धरताहेत.. अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्याला कुराणात दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे.. असं म्हणणं आहे याचं.. मला यांना विचारायचंय, 1. इथे आपण कायदे धर्मग्रंथातले पाळतो की देशातले? 2. शेकडो वर्षांपूर्वीच्या पुस्तकातले रेफरन्सेस आजच्या जगण्यासाठी घ्यायची गरज आहे का? 3. आणि जर त्याच मध्ययुगीन शिक्षा, नियम …

धर्म आणि धर्मांधता Read More »

साठ सरकारी मर्डर..

गोरखपूर सिव्हिल मध्ये ऑक्सिजन संपला म्हणून साठ कोवळ्या जीवांचा बळी गेला.. वाचून कोणीही सेन्सिटिव्ह माणूस सुन्न होईल अशीच ही घटना आहे.. जे कोणी या घटनेवर सरकारच्या बाजूने एक्सक्युजेस देतील ते लोक “माणूस” म्हणायच्या लायकीचेच नव्हेत.. आणि, अशा ‘माणूस’ नसलेल्यांसाठी हा लेख..   गोरखपूर मधील घटना ऐकून मला प्रचंड वाईट वाटलं, पण आश्चर्य मात्र अजिबात वाटलं …

साठ सरकारी मर्डर.. Read More »

वैद्यकीय व्यवसायाचा कॉर्पोरेट धंदा…

हॉटेल टाकण्यासाठी तुम्ही आचारी असण्याची गरज नाही, तसंच हॉस्पिटल टाकण्यासाठी पण तुम्ही डॉक्टर असण्याची गरज नसते..ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते.. पण मोठया मोठया उद्योगपतींना हे चांगलंच माहिती होतं.. मग त्यांनी टोलेजंग कॉर्पोरेट हॉस्पिटल्स टाकली आणि त्याचा “मनी मेकिंग बिझनेस” बनवायला सुरुवात केली.. तिकडे जाणारा आधीचा श्रीमंत क्लास तर होताच, पण त्यात नुकताच उदयास आलेला …

वैद्यकीय व्यवसायाचा कॉर्पोरेट धंदा… Read More »

गुलामी

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका मालकाला वाटलं आपल्या गुलामाच्या गळ्यात एक पट्टा बांधावा, जेणेकरून इतरांना समजेल की हा गुलाम “पाळीव” आहे..त्याने बांधला पट्टा..पट्टा बांधताना त्याने गुलामाला त्याचे फायदे तोटे सांगितले का, किंवा गुलामाचे मत विचारात घेतले का, वगैरे प्रश्न येथे गौण आहेत.. कारण, गुलामांना स्वतःचे मत असायचा काळच् नव्हता तो..पण नंतर नंतर हे …

गुलामी Read More »

सेवाव्रती डॉक्टरांच्या निमित्ताने –

– डॉ सचिन लांडगे. *कसला भारी डॉक्टर आहे ना हा.. मला तर एकदम अभिमानच् वाटला यांचा.. खरंच, डॉक्टर असावा तर असा.. नाहीतरी, बाकी सारे लुटारूच आहेत..* हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यावर खूप साऱ्या लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.. इतर डॉक्टर कसे लुटारू ही घिसीपीटी पण लोकप्रिय टेप वाजवून आपल्या पोटातली मळमळ नेहमीप्रमाणे बाहेर …

सेवाव्रती डॉक्टरांच्या निमित्ताने – Read More »