Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

अगर आज ख़ामोश रहे, तो कल सन्नाटा छा जाएगा ।

दहशतवादी कारवायांच्या निषेधाचे सूर मुस्लिम समाजात इतके अल्पमतात आहेत की त्यांचा आवाज क्षीण पडतो.. हिंदू समाजात दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश प्रकरणात जसं तुटून पडलं जातं, तसा जोश आणि संख्याबळ मुस्लिमांच्यात नसतं.. ‘सेव्ह गाझा’ चा आवाज जितका दुमदुमतो तितका ‘बॅन तालिबान’ किंवा ‘Hell ISIS’चा आवाज अजिबातच नसतो..दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या गोष्टी समाजात तीन पातळींवर होत असतात –१. …

अगर आज ख़ामोश रहे, तो कल सन्नाटा छा जाएगा । Read More »

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे.. उर्फ DDLJ ..

  – ©️डॉ सचिन लांडगे. भुलतज्ञ, अहमदनगर.   आजच्या दिवशी पंचवीस वर्षांपूर्वी 20 ऑक्टोबर 1995 ला आजपर्यंतची सर्वात मोठी ब्लॉकबस्टर बॉलिवूड फिल्म रिलीज झाली होती, ती म्हणजे, डीडीएलजे! पिक्चरला गाण्याच्या ओळीवरून टायटल देण्याची, आणि पिक्चरच्या नावाचा (DDLJ असा) शॉर्टफॉर्म करण्याची पद्धत इथूनच चालू झाली असावी कदाचित.. कित्येक गोष्टींचा ट्रेण्डसेटर आणि रोमँटिक मुव्हीजचा माईलस्टोन ठरलेल्या या …

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे.. उर्फ DDLJ .. Read More »

“मानसिक आधारासाठी ईश्वर”..??

माझ्यासभोवती कित्येक श्रद्धावान लोक आहेत ज्यांच्याकडे तर्कावर जगण्याइतकी विचारक्षमता आणि त्याद्वारे तयार होणारी सारासार विवेकबुद्धी नाही.. जीवन व्यतीत करण्यासाठी कशावर तरी ‘श्रद्धा’ ठेवणे ही त्यांची मानसिक गरज आहे.. अशा लोकांचा ईश्वररूपी आधार काढून घेतला तर त्यांचं जगणं असह्य होईल, असं मला नेहमी सुचवलं जातं..ईश्वर अस्तित्वात आहे की नाही हे एकवेळ बाजूला ठेऊयात.. पण लोकांच्या मनात …

“मानसिक आधारासाठी ईश्वर”..?? Read More »

औषधांची सत्त्वपरीक्षा –

– डॉ सचिन लांडगे.   कोरोनावर औषध शोधल्याचे खूप दावे सध्या होऊ लागलेत.. मीडियापण “ब्रेकिंग न्यूज, अब तक की सबसे बडी खबर” असं म्हणत वेड्यासारखा थयथयाट करतेय, यावरून मला औषधं, त्यांची परिणामकारकता आणि दावे याविषयी सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत लिहावं वाटलं.. कुठलाही उपाय किंवा कुठलीही गोष्ट ही “औषध सापडले” म्हणून न्यूजवाले दाखवू शकतात, पण …

औषधांची सत्त्वपरीक्षा – Read More »

आहे मनोहर तरी…

नुकतीच मी एक पोस्ट टाकली होती, ज्यात उठसूट कोणीही लोक कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करतात आणि मीडिया ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज म्हणून वेड्यासारखं करतं, त्यां सगळ्या लोकांना त्यांच्या औषधांच्या परिणामकारकतेची जबाबदारी पण स्वीकारायला लावायला हवी, असा माझ्या पोस्टचा रोख होता.. ज्यांच्याकडं उपचारांसाठी मान्यताप्राप्त डिग्री नाही (ज्यांना आपल्याकडं भोंदू म्हणतात) त्यांना “तुम्ही डॉक्टर नसले (म्हणजे तुमच्याकडे …

आहे मनोहर तरी… Read More »

प्रेमातले गैरसमज

चपट्या नाकाची मुलगी आपल्याला सहसा आवडणार नाही, पण चीनमध्ये तिच्यावर मरणारे हजारो असतील!! पण त्या चिन्यांना चाफेकळी नाकाची मुलगी आवडणार नाही कदाचित.. असो.. सांगायचा उद्देश हा की, सौंदर्याच्या व्याख्या एकसारख्या अजिबात नसतात.. म्हणून म्हणलं जातं की, “सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीत असतं!” आपण सहज म्हणतो, ‘अर्रर्र, ही कसंकाय आवडली असेल त्याला?’ पण त्याला मात्र ती ‘परी’ …

प्रेमातले गैरसमज Read More »

सूर्य पाहिलेला माणूस –

  – डॉ सचिन लांडगे.   तारीख ३ एप्रिल १९९४.. मी नववीत होतो.. तेंव्हा आमच्याकडं ‘तरुण भारत’ यायचा.. त्याच्या रविवारच्या पुरवणीत लेख वाचला – ‘आता परमेश्वरालाच रिटायर्ड करा’.. लेखक होते श्रीराम लागू!   एवढा मोठा लेख पूर्ण वाचला.. माझी बौध्दिक पातळी चौदा वर्षांइतकीच! त्यात मन पूर्ण आस्तिक.. घरातल्या देवपूजेसाहित सगळे सोपस्कार मन लावून जिव्हाळ्याने करण्याचं …

सूर्य पाहिलेला माणूस – Read More »

स्वदेस

आजच्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबरला बरोबर पंधरा वर्षांपूर्वी स्वदेस रिलीज झाला होता. मला आवडलेल्या अनेक चित्रपटांपैकी हा एक चित्रपट. आणि रेल्वेतला जो सिन आहे, तो आतापर्यंतच्या अनेक काळजाला भिडणाऱ्या दृश्यांपैकी एक आहे.. हा सिनेमा पाहताना या सिन च्या वेळी टचकन डोळ्यात पाणी येतं.. आजही.. कितीदाही.. जमिनीचे पैसे मागायला गेलेल्या शेतकऱ्याला भेटून त्याच्याकडे एक दिवस राहून …

स्वदेस Read More »

ही क्लिनचिट महागात पडू शकते !

  कालच्या दोन बातम्या – एक हैदराबाद गॅंगरेप प्रकरणातील आरोपींचे पहाटे एन्काऊंटर आणि दुसरी उन्नाव गॅंगरेप प्रकरणातील जामिनावर सुटलेल्या आरोपींनी कोर्टात केसच्या सुनावणीसाठी जाणाऱ्या बलात्कार पीडितेला रस्त्यात जाळून मारलं.. आपल्या भारतात दोनच जाती आहेत – आतले आणि बाहेरचे!! जे व्यवस्थेच्या आतले आहेत, किंवा ‘आहे रे’ वर्गातले आहेत, ते आतले! मग त्यांच्यासाठी कायदे वेगळे, कायद्यांचे अर्थ …

ही क्लिनचिट महागात पडू शकते ! Read More »

भुलभुलैय्या भुलेचा..

आज 16 ऑक्टोबर.. इतिहासातल्या ज्या ज्या घटनांनी जग बदललं, यातली एक घटना आजच्या दिवशी 1846 साली घडली होती. ‘नायट्रस ऑक्साईड’ हा वायू ‘लाफिंग गॅस’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा शोध लागला तेंव्हा तो वायू हुंगण्याच्या पार्ट्या होत असत. मोठेमोठे अमीर-उमराव जेवणानंतर नायट्रस हुंगत आणि मोठ्यामोठ्याने हसत सुटत, एकमेकांच्या माकडचेष्टा करत, याने त्यांची चांगलीच करमणूक होत असे.. …

भुलभुलैय्या भुलेचा.. Read More »