Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

डॉ. सचिन लांडगे

आपण घरी गणपती का बसवतो?

आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात गणपती असतोच, त्याशिवाय घरात गणपतीचे फोटो ही असतात, किंवा गणपतीचे चित्र असलेले कॅलेंडर तरी असते.. तरीही या दहा पाच दिवसांसाठी आपण बाहेरून गणपती विकत आणून बसवतो आणि नंतर विसर्जीतही करतो.. का? कोणत्या पोथीत हे लिहिलेय?कोणत्या पुराणात हे सांगितलंय?कोणत्या धार्मिक परंपरेत हे लिहिलेय? टिळकांनी ही प्रथा सुरू केली हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे.. …

आपण घरी गणपती का बसवतो? Read More »

इकोफ्रेंडली बकरी ईद च्या निमित्ताने…

मांसाहार करणं अजिबात वाईट नाही, पण देवाधर्माच्या नावाखाली बळी किंवा कुर्बानी देणं हे मात्र निश्चित चूक आहे.. देवासाठी कोंबडा बळी देण्याची प्रथा जशी मला मंजूर नाही तसे बकरी ईदच्या निमित्ताने अल्लाहला बोकडाची कुर्बानी द्यायचा प्रकार मला अजिबात मंजूर नाही, आणि याचा सरळ सरळ विरोध आपल्यासहित सर्वच् समाजाने करायला हवा.. पण त्याला उगीच धार्मिक चढाओढीचा रंग …

इकोफ्रेंडली बकरी ईद च्या निमित्ताने… Read More »

भाकरीचा प्रश्न मिटल्यावर काय होतं?

  दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न मिटल्यावर मग माणसांचे बाकीचे उद्योग सुरू होतात..   १. माणसाला मग आपल्यासारखी मतं असणारी (like minded) किंवा आपल्यासारखाच विचार करणारी माणसं जवळ करावीशी वाटतात..   २. मग अशा समविचारी लोकांचे गट, ग्रुप, मंच, फोरम, संघ, संघटना, सांप्रदाय, पक्ष, धर्म बनतात..   ३. मग आपल्या आयडियलॉजीचे गोडवे गाणारे ग्रंथ लिहिले जातात.. …

भाकरीचा प्रश्न मिटल्यावर काय होतं? Read More »

खानदानी डीएनए

  मित्रा,   तू वाहतोस गर्व उच्चवर्णीय असल्याचा,किंवा शुद्ध रक्तीय आर्यवंशी असल्याचा..अथवा, वाहतोस माज,किती तरी कुळाचा,सळसळत्या रक्ताचा,तळपत्या तलवारीचा.. वगैरे.. असो बाबा तुझा गर्व तुझा माजतुला लखलाभ..   पण मित्रा,मग हाच गर्व आणि माज घेऊनकाही पिढ्या मागं जा..परकीय आक्रमकांच्या दमनचक्राततुझी कोणतीच पूर्वज सापडली नाहीआणि ,कुठल्याच संकराला कारणीभूत झाली नाही..तू सांगू शकतोस का शपथेवर,की, असं मुळीच झालं …

खानदानी डीएनए Read More »

रफू ..

रफू केलेल्या भावना, उसवलेली नाती,आणि अल्टर झालेल्या जाणिवा घेऊन,कुठवर हे तडजोडिंची ठिगळं लावलेलं आयुष्य जगायचं? विदीर्ण झालेला परिस्थितीचा सदरा,उसवलेल्या टिपांसाहित घालायचा..कधी लाज झाकण्यासाठी वापरायचा,कधी सुखांची एम्ब्रॉयडरी करून मिरवायचा..मग, तुटलेल्या गुंड्या, उसवलेल्या काज्या,आणि मळलेली कॉलर घेऊन,कुठवर हे चुरगळलेलं आयुष्य जगायचं? आयुष्याला सुखाच्या पिको-फॉलची हौस झेपत नाही..रोजच्या जगण्याला मौजेची झालर लावायची ऐपत नाही..कितीही टिपा मारल्या तरी,नवीन ठिकाणी …

रफू .. Read More »

मैत्री

मैत्री.. मैत्री दिनाच्या शुभेच्छा देणारे खूप मेसेज आले सकाळी सकाळी.. मग मला पूर्वी व्हाट्सएपवर आलेला एक जोक आठवला..नवरा बायकोत मित्रांवरून भांडण होते. बायको म्हणते तुमचे मित्र बिनकामाचे आहेत, एकपण धड नाही..मग नवरा म्हणतो, चल टेस्ट करू..तो बायकोच्या पाच मैत्रिणींना फोन करतो, आणि प्रत्येकीला विचारतो, “आमची ही रात्रीपासून घरी आली नाही, कुठे गेली काही माहिती आहे …

मैत्री Read More »

मैत्री – त्याची अन तिची !

मैत्री म्हणलं की डोळ्यासमोर मित्रामित्रातली मैत्रीच जास्तकरून येते.. अशा मित्रांचं आणि अशा मैत्रीचं गुणगान करणाऱ्या कविता/ मेसेजेस/ गाणी/ कथा-कहाण्या आणि पिक्चर्स भरपूर आहेत.. आता अगदी अलीकडच्या काळापासून मैत्रिणीमैत्रिणींचा ग्रुप आणि त्यांच्या बिनधास्त मैत्रीला देखील स्पेस किंवा consideration मिळू लागलं आहे..पण माझ्या लेखाचा विषय तो नाही.. मला नेहमीच वाटत आलंय की समाजातली जेवढी स्पेस मुलामुलांतली मैत्री …

मैत्री – त्याची अन तिची ! Read More »

मुस्लिमांनो, जरा विचार कराल..?

मी तुम्हाला बहुसंख्य हिंदू असे दाखवतो जे आपल्या धर्मातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, मागासलेले विचार सरळसरळ नाकारतात आणि त्याविरुध्द खुले आम चर्चा करतात किंवा समाज प्रबोधन करतात…. पण असे किती मुस्लिम बांधव दाखवता येतील ज्यांनी आपल्या धर्मातील अनिष्ट रूढी परंपरेला सार्वजनिक विरोध केलाय किंवा कशाचीच पर्वा न करता मुलतत्ववाद्यांच्या विरोधात मोहीम उघडलीय (हमीद दलवाई सारखी)… …

मुस्लिमांनो, जरा विचार कराल..? Read More »

पक्षनिष्ठा

आपण सहलीला जाताना आपली गाडी चालवायला ड्रायव्हर घेतो.. तेंव्हा, तो गाडी व्यवस्थित चालवितो का, व ड्रायव्हिंगसाठी तो सर्व दृष्टीने सक्षम आहे का हे पाहून घेतो, की केवळ तो आपल्या जातीचा/धर्माचा आहे म्हणून त्याला निवडतो..? तो गाडी चालवीत असताना त्याच्या ड्रायव्हिंगमधल्या चूका त्याच्या निदर्शनास आणून देतो, की मग त्याने कशीही चालवू देत गाडी (आपलाच माणूस आहे) …

पक्षनिष्ठा Read More »

पालकत्वाच्या नोंदी भाग ५ –

  – डॉ सचिन लांडगे.   प्रत्येक मुलाला अन मुलीला स्वावलंबनाचे धडे लहान वयातच दिले पाहिजेत.. पूर्वी फक्त मुलीलाच घरातली कामे शिकवत आणि मुलांना बाहेरची.. पण आता दोघांनाही घरातली बाहेरची असा भेदभाव न करता दोन्ही प्रकारची कामे शिकवली पाहिजेत.   प्रत्येक मुलाला अन मुलीला- (जरी घरात नोकर असतील तरीही) खालील गोष्टी करायला लावाव्यात..   १. …

पालकत्वाच्या नोंदी भाग ५ – Read More »