Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

Month: August 2022

खानदानी डीएनए

  मित्रा,   तू वाहतोस गर्व उच्चवर्णीय असल्याचा,किंवा शुद्ध रक्तीय आर्यवंशी असल्याचा..अथवा, वाहतोस माज,किती तरी कुळाचा,सळसळत्या रक्ताचा,तळपत्या तलवारीचा.. वगैरे.. असो बाबा तुझा गर्व तुझा माजतुला लखलाभ..   पण मित्रा,मग हाच गर्व आणि माज घेऊनकाही पिढ्या मागं जा..परकीय आक्रमकांच्या दमनचक्राततुझी कोणतीच पूर्वज सापडली नाहीआणि ,कुठल्याच संकराला कारणीभूत झाली नाही..तू सांगू शकतोस का शपथेवर,की, असं मुळीच झालं …

खानदानी डीएनए Read More »

रफू ..

रफू केलेल्या भावना, उसवलेली नाती,आणि अल्टर झालेल्या जाणिवा घेऊन,कुठवर हे तडजोडिंची ठिगळं लावलेलं आयुष्य जगायचं? विदीर्ण झालेला परिस्थितीचा सदरा,उसवलेल्या टिपांसाहित घालायचा..कधी लाज झाकण्यासाठी वापरायचा,कधी सुखांची एम्ब्रॉयडरी करून मिरवायचा..मग, तुटलेल्या गुंड्या, उसवलेल्या काज्या,आणि मळलेली कॉलर घेऊन,कुठवर हे चुरगळलेलं आयुष्य जगायचं? आयुष्याला सुखाच्या पिको-फॉलची हौस झेपत नाही..रोजच्या जगण्याला मौजेची झालर लावायची ऐपत नाही..कितीही टिपा मारल्या तरी,नवीन ठिकाणी …

रफू .. Read More »

मैत्री

मैत्री.. मैत्री दिनाच्या शुभेच्छा देणारे खूप मेसेज आले सकाळी सकाळी.. मग मला पूर्वी व्हाट्सएपवर आलेला एक जोक आठवला..नवरा बायकोत मित्रांवरून भांडण होते. बायको म्हणते तुमचे मित्र बिनकामाचे आहेत, एकपण धड नाही..मग नवरा म्हणतो, चल टेस्ट करू..तो बायकोच्या पाच मैत्रिणींना फोन करतो, आणि प्रत्येकीला विचारतो, “आमची ही रात्रीपासून घरी आली नाही, कुठे गेली काही माहिती आहे …

मैत्री Read More »

मैत्री – त्याची अन तिची !

मैत्री म्हणलं की डोळ्यासमोर मित्रामित्रातली मैत्रीच जास्तकरून येते.. अशा मित्रांचं आणि अशा मैत्रीचं गुणगान करणाऱ्या कविता/ मेसेजेस/ गाणी/ कथा-कहाण्या आणि पिक्चर्स भरपूर आहेत.. आता अगदी अलीकडच्या काळापासून मैत्रिणीमैत्रिणींचा ग्रुप आणि त्यांच्या बिनधास्त मैत्रीला देखील स्पेस किंवा consideration मिळू लागलं आहे..पण माझ्या लेखाचा विषय तो नाही.. मला नेहमीच वाटत आलंय की समाजातली जेवढी स्पेस मुलामुलांतली मैत्री …

मैत्री – त्याची अन तिची ! Read More »

मुस्लिमांनो, जरा विचार कराल..?

मी तुम्हाला बहुसंख्य हिंदू असे दाखवतो जे आपल्या धर्मातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, मागासलेले विचार सरळसरळ नाकारतात आणि त्याविरुध्द खुले आम चर्चा करतात किंवा समाज प्रबोधन करतात…. पण असे किती मुस्लिम बांधव दाखवता येतील ज्यांनी आपल्या धर्मातील अनिष्ट रूढी परंपरेला सार्वजनिक विरोध केलाय किंवा कशाचीच पर्वा न करता मुलतत्ववाद्यांच्या विरोधात मोहीम उघडलीय (हमीद दलवाई सारखी)… …

मुस्लिमांनो, जरा विचार कराल..? Read More »