लैंगिकता , मानसिक स्वास्थ्य आणि नैतिकता.. भाग २
मी 21 मार्चला “लैंगिकता , मानसिक स्वास्थ्य आणि नैतिकता” हा लेख फेसबुकवर टाकला.. कॉमेंट्स मधून, फोन करून अथवा इनबॉक्स मधून या लेखाला भरपूर प्रतिसाद मिळाला.. बऱ्याच जणांनी (विशेषतः स्त्रियांनी) कॉमेंट मधून बोलण्याऐवजी इनबॉक्स मध्ये संपर्क साधने जास्त पसंत केले.. यावरून याबाबतीत आपण (आणि आपला समाजपण) अजून ‘फ्री’ नसल्याचेच दिसले.. असो.. तरीही त्यांनी बोलण्याची डेअरिंग केली …