मनोगत
मी एक मध्यमवर्गीय घरात वाढलेला माणूस आहे.मध्यमवर्गीय कुटुंबामधल्या सर्वसामान्य धार्मिक रूढी-परंपरा, व्रतंवैकल्यं यांच्या संस्कारांत मी लहानाचा मोठा झालो. एवढंच नाही तर जवळपास निम्मंअधिक आयुष्य या सगळ्याचं मी पालन आणि जतन करत राहिलो. त्यानंतर मात्र माझ्यात काहीतरी बदलवणारी प्रक्रिया सुरू झाली. त्यातून मी आज इथवर पोहचलो आहे की, आता मी देव मानत नाही, धर्म मानत नाही. …