– डॉ सचिन लांडगे.
*कसला भारी डॉक्टर आहे ना हा.. मला तर एकदम अभिमानच् वाटला यांचा.. खरंच, डॉक्टर असावा तर असा.. नाहीतरी, बाकी सारे लुटारूच आहेत..*
हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यावर खूप साऱ्या लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.. इतर डॉक्टर कसे लुटारू ही घिसीपीटी पण लोकप्रिय टेप वाजवून आपल्या पोटातली मळमळ नेहमीप्रमाणे बाहेर टाकली आहे..
असो..
(त्या पोस्टची आणि फोटोची लिंक पहिल्या कॉमेंटमध्ये..)
*काही फॅक्टस -*
1. वयाच्या साधारण कितव्या वर्षी ही (ओपीडीची तपासणी फी न घ्यायची) उपरती झाली आहे माहिती आहे का?
“करून सावरून भागल्यावर म्हातारपणात ही उपरती होणे” ही गोष्ट पहिल्यांदाच घडतेय असं नाही.. बऱ्याच डॉक्टरांना त्यांच्या उत्तर-आयुष्यात ‘हिरो’ बनायची इच्छा निर्माण होते.. आणि मग असे लोक नवे ‘रामायण’ लिहायला घेतात..
त्यांच्या रामायण लिहिण्याविषयी मला अजिबात तक्रार नाही, ते चांगलंच आहे.. पण लगेच इथला तुचिया समाज आपसूकच बाकीच्या डॉक्टरांना ‘रावण’ करून टाकतो..!!
2. त्यांची तपासणी फी ऐच्छिक असेल तर मग आपण ऑपरेशन चार्जेस बद्दलपण हीच भूमिका असायला हवी ना? पेशन्टने देईल तेवढेच हॉस्पिटलचे बिल पण घ्यायला हवे ना?
पण तसे नाहीये.. ओपीडीची तपासणी फी न घेणाऱ्या, किंवा बिलात 15-30% सवलत देणाऱ्या या डॉक्टरांचे ऑपरेशनचे चार्जेस ऐकले तर तुम्हाला दहा वेळा चक्कर येईल.. एकदा प्रत्यक्ष भेट देऊनच खात्री कराच..
3. ही त्यांची धंद्यातली चाल (professional gimmick) नसेल कशावरून?
तपासणी फीसच्या >50-100 रुपयांवर पाणी सोडायचे, मग भारावलेला पेशन्ट त्याच ठिकाणी ऑपरेशन करून घ्यायला लवकर तयार होतो.. आणि वर दोन पेशंट्स जास्तही घेऊन येतो..
(तसंही, अशा “फुकट मिळालं की भारावून जाणाऱ्या” तुचिया लोकांची कमी नाहीये भारतात!!)
4. पुणे-३० मधील ह्या डॉक्टरांकडे येणारा मोठा वर्ग हा श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्ग आहे.. जे ‘ऐच्छिक’ शब्द ऐकून पाचशे -हजार अशा नोटा देण्याचीच शक्यता अधिक आहे..
म्हणजे तसाही फायदा अन असाही फायदा..
*आता माझे समाजासाठी काही प्रश्न..*
(उत्तरे अपेक्षित नाहीत.. आपली आपणच ती शोधावीत..)
1. कुणी फुकट देत असेल तर तो समाजसेवकच् आहे असं समजून भारावून जाण्याचा आणि लगेच तिथे रांगा लावण्याचा भिकारचोटपणा चुकीचा आहे असं आपल्याला मनोमन वाटत नाही काय?
(हाच भिकारचोटपणा अंबानीने हेरून आपल्याला ‘जिओ’ फुकट दिलं होतं!!)
2. एखाद्याची फी ऐच्छिक आहे असं कळलं की ती न देण्याचा, किंवा इतर कुठल्याही व्यावसायिक व्यक्तीची फी बुडविण्याकडे कल असण्याचा जन्मजात गांडुपणा, उत्क्रांतीच्या नेमक्या कोणत्या टप्प्यात आपल्या जीन्समध्ये आला असेल?
3. डॉक्टरने आपल्याला फुकट तपासावे किंवा फुकट उपचार द्यावे असं आपल्याला का वाटतं?
तो तुम्हाला तुमचा हक्क वाटतो की ती डॉक्टरची ड्युटी वाटते?
4. डॉक्टरांकडून मोफत अथवा माफक दरात सेवेची अपेक्षा ठेवणाऱ्या समाजाच्या कोणत्या घटकाने त्यांचीपण सेवा ऐच्छिक ठेवली आहे?
ज्या ज्या थोर लोकांनी त्या फोटोखाली कॉमेंट्स केल्या आहेत (उदा. आयटीवाले, बँकर्स, इंजिनिअर, कापडदुकानदार, बेकरी, पुस्तक दुकानदार, शोरूम, मॉलवाले किंवा इतरही कित्येक..) यापैकी कितीजणांनी आपली सेवा ऑप्शनल ठेवली आहे.. (निदान आठवड्यातून एक दिवस तरी..)
**
“सेवा” या शब्दाचे दोन अर्थ होतात. पहिला म्हणजे, गरिबांची, दिन दुबळ्यांची वगैरे.. हि सेवा मानवतावादी असते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती ‘केली’ जाते.
दुसरी सेवा म्हणजे, अर्थव्यवस्थेच्या सेवा.. कृषी, उद्योग, वैद्यकीय इ.
इथे सेवा ‘केली’ जात नाही, तर ‘दिली’ जाते, पुरविली जाते. अर्थातच योग्य तो मोबदला घेऊन..
वैद्यकीय सेवा हि दुसऱ्या प्रकारातली सेवा आहे.
वैद्यक व्यवसाय हा अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्रातील एक ‘व्यवसाय’आहे. कुठलीही वस्तू किंवा सेवा फुकट मिळत नाही, तर त्यासाठी मोबदला द्यावा लागतो, म्हणून वैद्यकीय सेवा देखील फुकट मिळणार नाही हे समाजाला अजून पटतच नाहीये..
गोची इथेच होते. सेवांच्या या दोन प्रकारांमध्ये गल्लत होते. आणि हि गोची समाजात, सरकारमध्ये, आणि वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमध्ये पण पाहायला मिळते..
कुठलाही इंजिनिअर समाजासाठी डिजाईन्स फ्री बनवून देत नाही (अगदी म्हातारपणात सुद्धा..), वकील कुणाचंही सरसकट फ्री कन्सल्टेशन करत नाही, सीए समाजातील कोणाचेही फ्री मध्ये ऑडिट करून देत नाहीत, शिक्षक रिटायर झाल्यावरसुद्धा फ्री क्लासेस घेत नाहीत..
मग डॉक्टरकडूनच समाज अशी अपेक्षा का करत असावा बरं..?
बर.. समाज डॉक्टरला कोणत्या गोष्टी मोफत अथवा कमी रेट ने देतो..?
समोरचा डॉक्टर आहे म्हणून, एखादा वकील त्याच्याकडून कमी फी घेतो का? एखादा जागा कमी भावात डॉक्टरला विकतो का? एखादा फ्लॅट किंवा हॉस्पिटलचे कमी भाडे घेतो का? एखादा त्याच्या मुलाला फ्री शिकवतो का? एखादी शाळा कमी फिस घेते का? एखादा दुकानदार ना नफा ना तोटा दराने वस्तू विकतो का? एखादा शेतकरी डॉक्टरला कमी दरात धान्य किंवा भाजी विकतो का?
मग डॉक्टरने कमी दरात समाजाला उपचार द्यावेत ही अपेक्षा समाज का बाळगून असतो..?
उलट, समोरचा डॉक्टर आहे असं समजल्यावर वकीलापासून प्लम्बर पर्यंत सगळे त्याच्याकडून फी जास्त घेतात.. डॉक्टर आहे म्हणलं की जागेचा भाव पण त्याच्यासाठी जास्त असतो..
डॉक्टरांना सेवा करण्याचे डोस पाजणारे सरकार डॉक्टरांना वीज, पाणी, जागा, वाहतूक, मशिनरी यातल्या कुठल्या गोष्टीत कन्सेशन तर देत नाहीच, पण उलट “ग्राहक संरक्षण कायद्यात” हा व्यवसाय आणून सगळाच घोळ घालून ठेवते..
**
समाजात एकंच गोष्ट वेगवेगळ्या दर्जाची मिळत असते.. पैसे देऊन आपल्याला जास्त दर्जाच्या सेवा घेता येतात.. चहा पाच रुपयाला पण मिळतो, आणि पाचशे रुपयाला पण मिळतो..! आपण आपल्या शौकनुसार आणि खिशानुसार ठरवायचे की टपरीवरचा प्यायचा की ताज मधला प्यायचा..
ताजला चहा पिऊन तुम्ही ओरड करू शकत नाहीत की आम्हाला लुटले म्हणून..
तसंच, ब्रीचकँडी किंवा रुबी मध्ये जाऊन तुम्ही ओरड करू शकत नाही की आम्हाला लुटले म्हणून..
कुठल्याही ठिकाणी संभाव्य बिलाची साधारण पूर्वकल्पना देतात.. तुमच्या खिशाला परवडत नसेल तर जाऊ नका.. इतकं साधं गणित आहे..!
जसं स्वतःच हायफाय हॉस्पिटलमध्ये जाऊन, आपल्याला लुटल्याची तक्रार करू नये, तसंच, छोट्या आणि कमी दरात सेवा पुरविणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन हायफाय अपेक्षाही करू नये..
सरकारी हॉस्पिटलमध्ये अगदी पाच रुपयांत कसलेही ऑपरेशन होते.. इतरही सेवाभावी संस्था आणि ट्रस्टची अनेक हॉस्पिटल अत्यल्प दरात उपचार देतात..
डॉक्टरांच्या अनुभवानुसार किंवा उपलब्ध सोयीसुविधांनुसार खाजगी हॉस्पिटलचे दर ही कमी अधिक असतात.. त्यानुसार आपल्याला निवड करता येते..
पण लोकांना डॉक्टरही अनुभवी आणि बेस्ट पाहिजे असतो.. तो सहज आणि हवा तेंव्हा उपलब्धही पाहिजे असतो.. हॉस्पिटलमध्ये एसी पासून गरम पाण्यापर्यंत आणि नर्सपासून स्वीपरपर्यंत सगळ्या सोयी अपटुडेट हव्या असतात.. सगळ्या मशिनरी आणि तपासण्यांच्या सोयी एकत्र पाहिजे असतात.. आणि बिल मात्र कमी पाहिजे असतं..!!
कसं जुळणार हे गणित.?
सरकारी नॉर्मस् प्रमाणे हॉस्पिटल बांधायचे, सरकारी नॉर्मस् प्रमाणे स्टाफ आणि मशिनरी ठेवायच्या म्हणलं तर उपचाराचा खर्च किती जातो, याची काहीही कल्पना जनसामान्याला नसते.. आणि त्यांना हे समजून घ्यायची इच्छाही नसते..
असो..
डोक्याला जास्त ताण देऊ नका..
या सगळ्याची उत्तरे तुम्हाला माहिती आहेत, पण तरी पण “डॉक्टरने समाजाचा विचार करून सेवाच केली पाहिजे”, हे तुमचे पालुपद कायम राहणार आहे हे ही मला माहिती आहे..
पण निदान एक कृपा तरी करा..
एखाद्या डॉक्टरला सेवाव्रती व्हावं वाटलं तर तो त्याचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे.. पण म्हणून इतर डॉक्टर लुटारू किंवा कमी दर्जाचे ठरवू नका..
धन्यवाद.
**
(माझा कोणालाही वैयक्तिक दुखविण्याचा हेतू नाही.. त्या पोस्टवरील कॉमेंट्स मुळे दुखावला गेल्याने, दुसरी बाजूही प्रकाशात यावी याचा हा अल्पसा प्रयत्न..)