– डॉ सचिन लांडगे.
तुम्हाला माहितीये का 90 च्या दशकात अंनिस खूप फार्मात होती. काळी जादू करणारे, भानामती करणारे, करणी करणारे यांचा भांडाफोड होत होता. एकामागून एक चमत्कारी बाबांचे भिंग फुटत होतं.
हातातून अंगारा काढून दे, घड्याळ, चैन, प्रसाद अशा वस्तू काढून दे, असं करणाऱ्या बाबा बुवा मौलवी पाद्रीना आव्हानं मिळत होती.
पुढं जशी जशी टेक्नॉलॉजी विकसित झाली, तसं तसं अशा चमत्कारी बाबांना काम करणं मुश्किल होऊ लागलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सत्यसाईबाबा. सीसीटीव्ही फुटेज ने त्यांची हातचलाखी पकडली.
आताच्या काळात मात्र बाबा लोक सुधारले आहेत. त्यांचे देखील इव्होल्युशन झालंय असं आपण म्हणू शकतो. आता ते असे जाहीर चमत्कार करून दाखविण्यापासून वाचतात.
जे शिकले सावरलेले हुशार आहेत ते छद्मविज्ञानाचा सहारा घेतात, आणि जे अडाणी आहेत, ते “ये खाओ किरपा आयेगी, वो करो भाग्य फुलेगा” असे तोडगे सांगत राहतात.
तर झालं असं की, “मी लोकांच्या मनातलं ओळखून दाखवतो”, असा दावा करणाऱ्या आणि दिव्य दरबार भरवून लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्या धिरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज याला अंनिस ने आव्हान दिले. आणि दावा खरा करून दाखविला तर 30 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मग काय व्हायचे ते झाले. बाबाने आपला दिव्य दरबार दोन दिवस आधीच आटोपता घेऊन पोबारा केला, आणि मिडिया समोर “अंनिस हिंदुद्रोही आहे” वगैरे नेहमीची रडारड सुरू केली. असो..
(बाकी या धिरेंद्र महाराजाची स्टोरी मोठी ऐकण्यासारखी आहे. मोठे मोठे नेते, उद्योजक, आयएएस, आयपीएस, याच्या नादी लागले आहेत. कॉमेंट मध्ये लिंक दिली आहे).
आता मूळ मुद्दा.
चमत्कार करणारे, किंवा सिध्दी प्राप्त झाली वगैरे दावा करणारे ज्यांच्यासमोर फुटकळ ठरतील, अशा दोन तीन भयंकर हुशार बाबांची खरी भीती समाजाला आहे.
फिजिक्स केमिस्ट्री कॉस्मोलोजी अशा क्षेत्रातल्या संशोधनाचे दाखले देत ही लोकं विज्ञानाला गुढतेच्या दावणीला आणून बांधतात. याला छद्मविज्ञान म्हणतात.
बऱ्याच लोकांना ते खरं बोलताहेत की खोटं हे तपासणे शक्यच नसतं. कारण अगदी उच्चशिक्षित लोकांची देखील फिजिक्स केमिस्ट्री कॉस्मोलोजी अशा क्षेत्रातलं ज्ञान कमी असतं. बरं तासभर खरं बोलून हळूच एक स्वतःच्या अकलेचा तारा तोडला जातो किंवा अजब दावा केला जातो; तो किती खरं आणि कुठं खोटं बोलत आहे, हे केवळ त्या त्या क्षेत्रातले आणि Scientific temperament बाळगणारे लोकच ओळखू शकतात.
Science is dope नावाचे You tube चॅनल आहे. प्रणव राधाकृष्णन म्हणून बंगळुरूचा You Tuber हा त्याचा एक content creator आहे. (लिंक कॉमेंट मध्ये). तो अशा Pseudoscience पसरविणाऱ्या अनेक व्यक्तींची आणि त्यांच्या दाव्यांची/ व्हिडिओजची पोलखोल करतो.. त्याचे सद्गुरु आणि श्री श्री ची पोल खोल करणारे व्हिडिओज तर खूपच “to the point” आहेत.
बरेच अति उच्चशिक्षित लोक देखील अशा बाबांचे Quotes आणि व्हिडिओज रोज सोशल मीडियावर शेअर करत असतात, काही त्यांच्या प्रवचनांना हजेरी देखील लावत असतात, आणि या प्रवचनांखेरीज “Save Soil”, “यमुना बचाओ” अशा लोकोपयोगी वाटणाऱ्या पण त्या बाबांचा मुळ अजेंडा डायल्युट करणाऱ्या कार्यक्रमांना भुलून त्यांचे जास्तच उदो उदो करत असतात.
खरा धोका तो आहे.
– डॉ सचिन लांडगे.
**