Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

दुटप्पीपणा –

 

– डॉ सचिन लांडगे.

 

गुटखा खाऊन लोकं कॅन्सरनं मेली तरी चालतं, पण मटण खाल्लं की मात्र पाप लागतं..

अन्नधान्यात घातक भेसळ केली तरी चालतं, पण मटण खाल्लं की मात्र पाप लागतं..

वजनात काटा मारणं, लांडीलबाडी, सावकारकी, फसवणूक केली तरी चालतं, बँकांची कोट्यावधीची कर्जे बुडवून देश सोडला तरी चालतं, पण मटण खाल्लं की मात्र पाप लागतं..

तुमच्या रिसॉर्टस आणि फाईव्ह स्टार हॉटेलांत नॉनव्हेज सर्व्ह केलेलं चालतं, पण इतरांनी मटण खाल्लं की मात्र पाप लागतं..

तुमच्या मॉल्स आणि सुपर मार्केटमध्ये मटण मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला विकला तर चालतो, पण इतरांनी मटण खाल्लं तर मात्र पाप लागतं..

जर मटण खाल्ल्याने पाप लागतेय, तर मग आपल्याकडे हजारो वर्षांपासून पशुपालन कशासाठी होतेय?

दुधाची सगळी गरज तर गायी म्हशीच भागवतात.. तर मग शेळ्या मेंढ्या आणि कुक्कुटपालन करणारे सगळे नीच ‘पापी’च म्हणायला हवेत!!

जेवढा बकरी किंवा कोंबडीला जीव असतो तेवढाच एखाद्या माशी किंवा डासालाही आपला जीव प्यारा असतो… मग ‘अहिंसा परमो धर्म’ म्हणणारे घरात डासांसाठी ‘ऑल-आऊट’ किंवा ‘हिट’ वापरंतच् नाहीत का हो…?

एका माणसाच्या शरीरात अब्जावधी सूक्ष्मजीव सुखाने नांदत असतात. मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटि) दर मिनिटाला हजारो जीवाणू आणि विषाणुं आपोआप मारत असते ! अगदी खोलात जाउन सांगायचे तर आपल्या डोळ्याच्या पापणीच्या एका उघडझापेत काही शेकडा सूक्ष्मजीव त्यातील एंझाईम्समुळे मरतात..

वातावरणातून अन्नातून लाखो सूक्ष्मजीव शरीरात प्रवेशत असतात. केवळ ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून त्यांचे अस्तित्वच नाकारायचे का हो.?

मग बारीक विचार केला तर इतक्या टोकाच्या अहिंसेचा आग्रह धरणाऱ्यांनी Antibiotics पण नाही खाल्ले पाहिजेत. तेवढेच करोडो सूक्ष्मजीवांचे प्राण वाचतील..!! कारण अँटिबायोटिक्स औषधे शरीराला घातक बॅक्टेरिया तर मारतेच, पण शरीराला उपयोगी जिवाणू (नॅचरल बॅक्टेरियल फ्लोरा) पण करोडोंनी मरतात..

समजा आपण रोज जरी मटण खाल्लं, तरी आपण आपल्या आयुष्यात इतकी बोकडं मारणार नाही, जितके सजीव आपण रोज मारतो..!!

लोकांच्या संवैधानिक हक्कांवर गदा आणून, टोकाच्या अहिंसेचा अतिरेकी आग्रह धरणे हीच एक ‘हिंसा’ आहे..

**

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *