Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

जळणारे काजवे –

 

– डॉ सचिन लांडगे.

 

काही लोक काजव्यासारखे असतात. सतत जळत असते त्यांची..

आपल्या आजूबाजूला खूप लोक वरून शांत असतात/दिसतात पण आतून ते बरेच फ्रस्ट्रेटेड असतात. एकतर नोकरी व्यवसायाच्या फ्रंट वर पीडित असतात, आर्थिकदृष्ट्या पीडित असतात किंवा कौटुंबिक फ्रंट वर खचलेले असतात, किंवा लैंगिक कुपोषित तरी असतात. असे फ्रस्ट्रेटेड लोक नंतर नंतर विकृत बनत जातात. जी गोष्ट त्यांना मिळत नसते त्या बाबतीतच ते विकृत बनतात. समजा एखादा डॉक्टर आहे, तर तो हुशार असतो, पेशंट्सशी देखील चांगला रेपो असणारा असतो, पण ज्या ज्या गोष्टीतली उपासमार किंवा फ्रस्ट्रेशन त्याला विकृतीकडे घेऊन गेलंय (किंवा नेऊ लागलंय) त्या गोष्टीबाबत अशी लोकं एकदम निराळं वागतात, अनाकलनीय वागतात.. कुठंतरी त्यांच्या मनातली गरळ ओकतात.. आणि आपण म्हणतो, ‘हा गायक आहे हा शास्त्रज्ञ आहे डॉक्टर आहे वगैरे वगैरे पण तो माणूस म्हणून किती नीच आहे ते आज कळलं!’ वास्तविक पाहता सभ्यतेचे बुरखे पांघरून वावरणारे अतृप्त आत्मे ढिगानं आहेत आपल्या आजूबाजूला..

  1. आता काय झालंय माहिती आहे का, की , अशा विविध उपासमारीने ग्रस्त असलेल्या प्रेमकुपोषित लोकांना सोशल मीडियामुळे आणि फेसबुकच्या अल्गोरिदम मुळे ‘like minded’ लोक हळूहळू भेटू लागलेत, त्यांचे कळप तयार होऊ लागलेत, अन म्हणून hate speech देताना, hatred पसरविताना, कोणाच्या पोस्टस् वर विकृत कॉमेंट्स करताना त्यांची भीड चेपू लागलीये.. त्यांनाही छोटे व्यासपीठ मिळू लागलेय.. हे काळजी करण्यासारखं आहे.

बर्बाद गुलिस्ताँ करने को बस एकही उल्लू काफ़ी था,
हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम ऐ गुलिस्ता क्या होगा ।

**

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *