हे चॅलेंज घ्यायला आहे का कोणी तयार…?!!
प्राप्त सिद्धीच्या जोरावर शनीची दशा बदलणारे..
आपल्या मंत्र सामर्थ्याने पत्रिकेतला मंगळ निष्प्रभ करणारे..
सर्व मंत्रशक्ती तंत्रशक्तीवाले, सूक्ष्मरुपात परग्रहावर वावरण्याची भाषा करणारे टणाटण वाले, जागृत देवस्थानवाले, बाबा, बापू, बुवा, डबल श्री, सद्गुरू , अम्मा-टम्मा, योगी, स्वामी, उलेमा-सुलेमा, पाद्री, होली वॉटरवाले इत्यादी इत्यादी…
पाऊस पाडणारे, तोडगे सांगणारे, बुडालेली नौका वर काढणारा सत्यनारायण घालणारे, किंवा चंद्राला गिळणाऱ्या राहू केतू ची दशा बदलणारे.. कितीही होमहवन करा, मंत्र म्हणा, नमाज पढा, मेणबत्त्या लावा, काहीही उपद्व्याप करा म्हणावं.. पण तेवढा चांद्रयानाचा संपर्क करून द्या..
भारताचे कोट्यावधी रुपये सार्थकी तर लागतीलच, पण स्वतःलाही प्रसिद्धीतुन कोट्यावधी कमवायची संधी आहे..
चलो, खुद को कर दो साबित…